घरताज्या घडामोडीOmicron Variant: मुंबईकरांनो, आठवड्याभरात कळणार मुंबईत ओमिक्रॉन आहे की नाही?

Omicron Variant: मुंबईकरांनो, आठवड्याभरात कळणार मुंबईत ओमिक्रॉन आहे की नाही?

Subscribe

सध्या जगभरात ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटची दहशत सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे सर्व देश सतर्क होऊन ओमिक्रॉनला रोखण्यासाठी कडक पाऊले उचलत आहे. काही देशांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकाही सावध झाली असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्यावर भर देत आहे. दरम्यान मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आहे की नाही? हे आठवड्याभरात कळणार आहे. पाच ते सात जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येऊ शकतो.

सध्या दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. २४ नोव्हेंबर दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दिल्लीहून डोंबिवलीत आला होता. दिल्ली विमानतळावर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना सांगितले आणि तेव्हा तो एकटाच घरी विलगीकरणात राहत होता. या व्यक्तीचे जिनोम सिक्वेसिंगसाठी नमुने सोमवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आलेत. पण गेल्या १५ दिवसांत ओमिक्रॉन पसरलेल्या देशातून आलेल्या १०० जणांपर्यंत मुंबई महापालिका पोहोचली. यामधील कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आले नाही. तसेच गेल्या पंधरवड्यात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून मुंबई विमानतळावर आलेले ४०० लोक शहराबाहेर आणि जिल्ह्यात राहत आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिका ३०० ते ३५० नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग कस्तुराबाच्या लॅबमध्ये करते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, रुटीन प्रोटोकॉलनुसार आम्ही रुग्णालय आणि विमानतळावरून २०० कोरोना पॉझिटिव्ह नमुने घेतले आहेत. सिक्वेंसिंग करण्यापूर्वी पुढील २४ ते ४८ तासांत बीएमसी आणखीन १००-१५० नमुने गोळा करेल. ज्यांची सिक्वेंसिंग पूर्ण होण्यास तीन दिवस लागू शकतात. मग आमच्याकडे आठवड्याच्या शेवटी किंवा सोमवारी उत्तरे असू शकतात.

दरम्यान दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरियंटने कहर केला होता आणि त्यानंतर डेल्टा प्लस येण्याची शक्यता वर्तवली जात होता. त्यादरम्यान ऑगस्टमध्ये मुंबईत महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी लॅब सुरू केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -