घरमहाराष्ट्रबाजार समित्यांच्या निकालानंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; जनतेचा कल...

बाजार समित्यांच्या निकालानंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया; जनतेचा कल…

Subscribe

सांगली : बाजार समितीच्या निवडणुकीत (market committee election) महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आनंद व्यक्त करताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बाजूने दाखवून देणार आहे.

राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आज समोर आले आहेत. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपला मविआनं चांगलाच दणका दिला आहे. राष्ट्रवादीने बारामतीत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील १८ जागांपैकी सर्व १८ जागांवर विजय मिळवल्यानंतर जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून गेल्या आठ ते दहा महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे तब्बल 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत कल देत जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिले असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे. महाविकास आघाडीने 148 बाजार समित्यांपैकी 75 पेक्षा जास्त बाजार समित्यांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी राहिली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतीने महाविकास आघाडीच्या बाजूने कल देऊन कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. पदवीधर निवडणुकीत लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणारे सदस्य, सोसायटी सदस्य, व्यापारी हे सर्वच लोक महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना राष्ट्रवादीचे मतदारसंघात विजय मिळाल्यामुळे जयंत पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील बाजार समित्यांपैकी जत, कवठे महांकाळ, मिरज तालुक्यातील 18 जागा जिंकून आल्या आहेत. सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र आल्यावर काय करुन दाखवते हे स्पष्ट झाले आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -