Eco friendly bappa Competition
घर क्रीडा दिल्लीचा अवघ्या 9 धावांनी पराभव; मार्श-सॉल्टची अर्धशतकी खेळी व्यर्थ

दिल्लीचा अवघ्या 9 धावांनी पराभव; मार्श-सॉल्टची अर्धशतकी खेळी व्यर्थ

Subscribe

नवी दिल्ली : IPL 2023 च्या 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने सलग तीन पराभवानंतर अखेर दिल्लीचा (Delhi Capital) अवघ्या 9 धावांनी पराभव केला.

अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) पार पडलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एका बाजूने पडत असताना सलामीवीर अभिषेक शर्मा आणि हेन्रीच क्लासेन या दोघांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 197 धावा केल्या. अभिषेक शर्माने सर्वाधिक 12 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 36 चेंडूत सर्वाधिक 67 धावा केल्या. याशिवाय क्लासेन नाबाद (53), अब्दुल समद (28), अकील होसेन (16) आणि राहुल त्रिपाठी (10) यांनी धावांचे योगदान दिले.इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. यावेळी दिल्लीकडून मिचेल मार्श याने 4 षटके गोलंदाजी करताना 27 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर ईशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

हैदराबादकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवता खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 चेंडूत शतकी भागिदारी करताना 112 धावा केल्या. त्यानंतर सॉल्ट 35 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 59 धावांवर बाद झाला. त्यानंतर मनिष पांडे, मार्श झटपट बाद झाले आणि थोड्या वेळाने प्रियम गर्ग अवघ्या 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर सरफराज खानही 9 धावा करून बाद झाला. शेवटी अक्षर पटेलने चांगले फटक मारत धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दिल्लीला विजय मिळवून देऊ शकला नाही. अक्षर पटेल 14 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकरांच्या मदतीने नाबाद 29 धावा, तर रिपल पटेलने 11 धावांचे योगदान दिले. यावेळी हैदराबादकडून मयंक मार्कंडे याने 4 षटके गोलंदाजी करताना 20 धावा देत सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, अकील होसेन, टी नटराजन आणि अभिषेक शर्मा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. या विजयासह हैदराबादने 6 गुण मिळवत आठव्या स्थानी झेप घेतली आहे.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -