घरमहाराष्ट्रST Workers : दगडफेकी मागच्या कर्ते करवित्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई...

ST Workers : दगडफेकी मागच्या कर्ते करवित्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करा – जयंत पाटील

Subscribe

आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य - जयंत पाटील

महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

या घटनेनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाला पाठिंबा नाही, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

“आज इथे काही घडलं त्या संदर्भात आश्चर्य वाटण्याचं काण नाही कारण नेता शहाणा नसला तर काय होत हे आपण पाहिलं. राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात पण टोकाची भमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. पण गेले काही दिवस आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनिय नव्हता. एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष घनिष्ट संबंध आहेत. गेली ४०-५० वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून चुकलं नाही. ज्या-ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला हातभार लावून साडवण्याच्या प्रयत्नासाठी आपल्या सहकार्यांनी कष्ट घेतले. या वेळेला एक चुकीचा रस्ता दाखवला त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी दिसत आहेत,” असं शरद पवार म्हणाले.

कारण नसताना कर्मचारी घराबाहेर

“कारण नसताना काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला. त्याच्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्यांच्या कुटुंबावर आलं. दुर्दैवाने काही व्यक्तिंना आत्महत्यासारखी टोकाची भमिका घ्यावी लागली. अशी टोकाची भमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करतं ते नेतृत्व आत्महत्या सारख्या गोष्टींना जबाबदार आहे. त्यातून जे काही नैराश्य आलं ते कुठं तरी काढलं पाहिजे त्यासाठी त्यांनी इते टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेजण एसटी कर्माचाऱ्यांच्या सोबत आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठिशी नाही. चुकीचा रस्ता दाखवत असेल तर त्याला विरोध करणं आपली सर्वांची जबाबदारी आहे. थोडी माहिती तुम्हाला कळताच तुम्ही तातडीने सहकारी इथे पोहोचले. संकट आलं की आपण सर्व एक आहोत हे तुम्ही दाखवलं, त्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो,” असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – ST Workers : घराबाहेर राडा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -