घरक्राइमजिंदाल कंपनी अग्नितांडव : प्रकल्प तूर्तास बंद करण्याचे आदेश

जिंदाल कंपनी अग्नितांडव : प्रकल्प तूर्तास बंद करण्याचे आदेश

Subscribe

नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कंपनीतील स्फोटाच्या घटनेनंतर तेथील प्लॉन्ट बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) कंपनीला दिले आहेत. प्लांटमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांसह अन्य सुविधांची पुन्हा उभारणी केल्यानंतर हा प्लांट सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. त्यामुळे हा प्लांट काहीकाळ बंद राहणार आहे. कंपनीने घटनेचा अहवाल सादर केला असून त्याची पडताळणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

आगीच्या घटनेनंतर एमपीसीबीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत कंपनी प्रशासनाला पत्र दिले आहे. त्यात प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच, भविष्यात प्रकल्प सुरू करताना प्रदुषणासह अन्य सर्व परवानगी घेतल्यानंतरच तो कार्यान्वित होऊ शकेल, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही महिने तरी जिंदालचा प्रकलप् बंद राहणार आहे.

- Advertisement -

जिंदाल पॉलीफिल्मस कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला तर, २० कामगार जखमी झाले. गेले दोन दिवस ही आग धुमसत होती. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेत समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुंढेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीला आग लागल्यानंतर य कंपनीत किती कर्मचारी उपस्थित होते आणि त्यापैकी किती कर्मचार्‍यांचा शोध लागला याबाबत कंपनी प्रशासनाकडून निश्चित माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच, चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी, महावितरण, औद्योगिक सुरक्षा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. मुंढेगाव परिसरात 1992 च्या दरम्यान जिंदाल पॉलिफिल्म कंपनीची प्रकल्प सुरू करण्यात आला. या कंपनीत पॉलिफिल्म्स तयार केल्या जातात. बोपेट व बोप असे पॉलिफिल्मचे दोन प्रकार असून दोन्ही प्रकारच्या पॉलिफिल्म्स जिंदाल कंपनीत तयार केल्या जातात.’

- Advertisement -

पॅकेजिंग, लेबलिंग व लॅमिनेशन इ. कामांसाठी या पॉलिफिल्म वापरल्या जातात. जिंदालमध्ये सुरवातीपासून बहुतांश परप्रांतीय कामगारच काम करत आहेत. हे सर्व कामगार कंपनीजवळील वस्तीवर वास्तव्यास आहेत. सध्या कंपनीत सुमारे अडीच ते तीन हजार कामगार कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी अवघे शंभर ते दीडशे कामगार स्थानिक आहेत. कंपनीत यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, काही वर्षांपूर्वी आगीची घटनाही घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -