घरमहाराष्ट्रज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी यांचे निधन; वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी यांचे निधन; वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

भाजपचे नेते माधव भांडारी यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे काल रात्री पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 60 वर्ष होतं. भांडारी यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी सुमित्रा भांडारी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजता पुण्यातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

सुमित्रा भांडारी या परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या होत्या. विद्यार्थी दशेपासून त्या परभणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत होत्या. लग्नानंतर त्या कोकण विभागात विविध सामाजिक संघटना आणि संस्थासोबत काम करत होत्या. मात्र त्यांच्या निधनामुळे भांडारी आणि वेलणकर कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवारास मोठा धक्का बसला आहे. भांडारी यांच्या पत्नीच्या निधनाची माहिती मिळताच भाजपसह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी सुमित्रा माधव भांडारी यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. माधवजी व भांडारी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत असं ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वाहिली श्रद्धांजली

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत सुमित्रा भांडारी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -