घरदेश-विदेशजिओचा धमाका ! गिगाफायबर लाँचची घोषणा

जिओचा धमाका ! गिगाफायबर लाँचची घोषणा

Subscribe

७०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत प्लान

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत जिओ गिगाफायबर लाँच करण्याची मोठी घोषणा केली. येत्या ५ सप्टेंबरला जिओच्या तिसर्‍या वर्धापन दिनी गिगाफायबर लाँच केले जाणार आहे. सुरुवातीला देशातील 1600 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

जिओ गिगाफायबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अ‍ॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे.

- Advertisement -

जिओ फायबरचा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, जिओ होम टीव्ही आणि जिओ-आयवोटी सेवा मिळणार आहे. यासोबतच जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे.

यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहापटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिऴणार आहे.

- Advertisement -

इंटरनेटचा वेग 1000Mbps ते 1 जीबीपीएस एवढा प्रचंड असणार आहे. यामध्ये डिजिटल टीव्हीसोबत क्लाऊड गेमिंगही करता येणार आहे. याशिवाय जिओने Postpaid Plus ही सेवाही लाँच केली आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन्स, डाटा प्लॅन, आंतरराष्ट्रीय रोमिंग, फोन अपग्रेडस्, होम सोल्यूशन तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असणार आहे. याशिवाय जिओने आणखी एक जबरदस्त प्लॅन लाँच केला आहे. जिओ फायबर ग्राहकांनी जर जिओ फॉरेव्हर प्लॅन घेतल्यास यामध्ये HD/4K टीव्ही आणि 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.

मिक्स रिअ‍ॅलिटी सादर, लवकरच उपलब्ध होणार
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा अंबानी यांनी मिक्स रिअ‍ॅलिटी डिवाईज सादर केले. हे डिवाईज जिओ कंपनीच्या एमआर प्रयोग शाळेत तयार करण्यात आले आहे. हे डोळ्याला लावून चित्रपट बघताना तुम्ही थिएटरमध्ये चित्रपट बघत आहात, असा अनुभव मिळणार आहे. या मिक्स रिअ‍ॅलिटीचा वापर वर्चुअल किंवा विंडो शॉपिंग आणि शिक्षणातही होणार आहे. समजा हे डिवाईज डोळ्याला लावून तुम्ही एखादा शर्ट पाहिला तर तो तुमच्या अंगावर कसा दिसेल हे तुम्हाला त्या डिवाईजमध्ये दिसणार आहे. हा डिवाईज लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

ठळक वैशिष्ट्ये
१)जिओ फायबर प्लॅन 700 ते 10 हजार रुपयांपर्यंत
२) आयुष्यभर मोफत कॉलिंग
३)प्रीमियम जिओ फायबर ग्राहकांना सिनेमा रिलीजच्या दिवशीच घरबसल्या पाहता येणार. जिओने या प्लॅनला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, असे नाव दिले आहे. ही सेवा 2020 पासून सुरू होणार आहे.
४) वर्षभराचा प्लान घेतला तर एचडी/ ४ के टीव्ही आणि ४ के सेट टॉप बॉक्स मोफत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -