घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, 'परत एकदा महाराष्ट्र पेटवणार'

जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, ‘परत एकदा महाराष्ट्र पेटवणार’

Subscribe

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. त्यांनी ट्विटरवर यासंबंधी विरोध दर्शवला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन सरकारने शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, ‘याविरोधात आपण शिवविचारांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटवणार’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराला विरोध केला आहे.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र पेटवणार… परत एकदा… शिव सन्मान परिषदा घेणार…बा.मो.पुरंदरेंना सन्मानित करुन शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले.’ यासोबतच त्यांनी ट्विटमध्ये श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांची नावे हॅशटॅग केली आहेत.

- Advertisement -

‘महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार’

जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधी आणखी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते स्वत: बोलत आहेत. या व्हिडिओमध्येही त्यांनी टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रभूषण दिला तेव्हाही आम्ही सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय? जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचे कौतुक केले होते. दर दोन-चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना परत जर पडद्यावर आणत असाल, पुरस्काराने गौरविणार असाल तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत? याबाबत सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार.’

- Advertisement -


हेही वाचा –जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -