घरमुंबईजितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या भेटी दरम्यान या दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड पुस्तक प्रकाशनाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती देखील मिळत आहे. मात्र, फक्त निमंत्रण देण्यासाठी एक तासाची चर्चा का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे.

भेटीवर प्रश्नचिन्ह कायम

भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. ऑक्टोबर महिन्यातही जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली होती. त्यातच आता महिन्याभरात पुन्हा जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने चर्चेना उधाण आले आहे.

- Advertisement -

भेटीला मिलिंद नार्वेकरही उपस्थित

उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार अनिल परब हे देखील या भेटी दरम्यान उपस्थित होते. जवळपास १ तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मनसेसोबत जवळीक वाढली असताना आता जितेंद्र आव्हाड यांची मातोश्रीवरील दुसरी भेट आता चर्चेचा विषय ठरू लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -