घरमुंबईदहशतवाद विरोधी जनजागृतीसाठी बोधचित्रफित उपयुक्त - मुख्यमंत्री

दहशतवाद विरोधी जनजागृतीसाठी बोधचित्रफित उपयुक्त – मुख्यमंत्री

Subscribe

राज्य दहशतवाद विरोधी पथकाद्वारे तयार करण्यात आलेल्या बोधचित्रफितीचे लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कळदाबून चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने तयार केलेले दहशतवादी कारवायांविरोधातील बोधचित्रफित जनजागृतीसाठी उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत. राज्य दहशतवाद विरोधी पथकाद्वारे निर्मित बोधचित्रफितीचे लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे कळदाबून चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माणचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन चित्रफित तयार करणाऱ्या दहशतवाद विरोध पथकाचे कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘नागरिकांमध्ये जाणीव जागृतीसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. या चित्रफित डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे.’ हिंदीसोबत मराठी भाषेतही या चित्रफिती तयार करून इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ‘राज्य दहशतवाद विरोधी पथकाला दोन वर्षात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण आपण करू शकलो, लोकांच्या भावना भडकावणाऱ्यांवर आणि दहशतवादी कारवायांवर आगामी काळात लक्ष द्यावे लागेल. यासाठी पथकाला अधिक सतर्क राहावे लागेल’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

बोधचित्रफितीमध्ये ‘ही’ माहिती देण्यात आली आहे

या बोधचित्रफितीमध्ये दहशतवादापासून दूर कसे रहावे?, वाईट लोकांपासून दूर कसे रहावे?, आपल्या मुलांना त्यापासून दूर कसे ठेवावे?, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी युवकांना त्यापासून रोखण्यासाठी ‘सुपर हिरोज’ कसे काम करतात?, याबाबतची माहिती दिली आहे. दहशतवादी कारवाया होऊ नयेत, यासाठी आपली सतर्कता, सहयोग, सक्रियता आणि राष्ट्रीय एकात्मता महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावेळी आठ बोधचित्रफितींचे सादरीकरण करण्यात आले. राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून चित्रफितीबाबत माहिती दिली. विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी यावेळी आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -