घरताज्या घडामोडीSt workers silver oak attack : सिल्व्हर ओकवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील...

St workers silver oak attack : सिल्व्हर ओकवरील हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील हल्ला – जितेंद्र आव्हाड

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवास स्थानावर झालेल्या हल्ल्यानंतरही संयमाने आणि शांत राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. कोणतेही वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या हल्ल्यानंतरही आपण एसटी कामगारांसोबतच आहोत. त्यांचे संसार सावरले पाहिजेत. एसटी कामगारांच्या संपामुळे जी अडचण तयार झाली आहे, ती अडचण दूर करायला हवी, हेच म्हणणे शरद पवारांनी पक्षासमोर मांडले आहे, असेही आव्हाड म्हणाले.

आज सिल्व्हर ओकवर जो हल्ला झाला, तो महाराष्ट्राच्या संस्कृतीवर जालेला हल्ला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मतभेद होते, आहेत, राहतील. पण मनभेद कधीच नव्हते. एसटी कामगारांचा इतिहास तपासला तर गेली ५० वर्षे त्यांचे नेतृत्व पवारांनी केले आहे. आतापर्यंत एसटी कामगारांची संमलेन झाली, त्याच्या उद्घाटक किंवा संमेलनाअध्यक्षाचे स्थान पवार साहेबांनी भूषावले आहे. एखाद्या चुकीच्या हातात कामगारांचे नेतृत्व गेले की त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आज दिसले.

- Advertisement -

याआधी १९९३ साली आम्ही खूप आक्रमक होतो, तेव्हा पवारांनी बोलावून आम्हाला सांगितले की राजकारणात विरोध करणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो. गोपिनाथ मुंडे संध्याकाळी ७ वाजता टीका केली. पवारांनी रात्री २ वाजता डीजीला बोलावून, गोपिनाथ मुंडेंची सुरक्षा दुप्पट केली. आज पवारांची नात आणि पत्नी दोघेही घरात टीव्ही बघत बसल्या होत्या. पवार साहेब असताना किंवा नसताना पोलीस घराला गराडा घालत नाहीत. कारण त्यांच्या राज्याच्या जनतेवर विश्वास आहे. असा क्रूर हल्ला करता, यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात वेदना आहेत. त्यामुळे ज्याने कुणी हे केल त्याला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. कायदा आपले काम करेल.

एमपीएससीचे आंदोलन होते, अचानक नेता उपस्थित होतो, अचानक लोक जमा होतात. हे सगळ जनता बघते आहे. आजही जे झाले त्याने जनता नाराज होईल. एक ८२ वर्षांचा व्यक्ती, ७५ व्यक्तीची पत्नी, २० वर्षाची नात घरी असतात तेव्हा घरावर हल्ला होतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तुम्ही शांत, अजिबात उद्विग्न प्रतिक्रिया देऊ नका. संकटकाळी आपण एकत्र असतो हे पवारांनी महाराष्ट्राला गेल्या ४० वर्षात दाखवले आहे. आज जे काही झाल त्याचा आम्ही धिक्कार करतो, असेही आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

ST Workers Protest: पवारांच्या घरावरील हल्ल्यावर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -