घरमहाराष्ट्रJitendra Awhad : अजित पवारांनी हद्द केली, नेता म्हणून लाज...; जितेंद्र आव्हाड...

Jitendra Awhad : अजित पवारांनी हद्द केली, नेता म्हणून लाज…; जितेंद्र आव्हाड का संतापले?

Subscribe

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा झाली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. ही शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करण्यात येईल, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहित, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड हे यामुळे संतापले आहेत. आव्हाडांनी अजित पवारांच्या या वक्तव्याच्या समाचार घेतला आहे. तुम्ही आज हद्द ओलांडली आहे, अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (Jitendra Awhad expressed anger over Ajit Pawar’s statement about Sharad Pawar)

हेही वाचा… Aaditya Thackeray : महाराष्ट्रातील गँगवॉरचे मुख्यमंत्री लीडर, आदित्य ठाकरेंचा आरोप

- Advertisement -

अजित पवारांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघत आहात . शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आपली उंची ओळखा. कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावे काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती, असा रागच आव्हाडांनी व्यक्त केला आहे.

तर, शरद पवार देशाचे नेते आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले. तीचे कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघता. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही. शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचे दिल्लीतील एक भाषण दाखवावे. शरद पवारांची खरी चूक आहे त्यांनी अजित पवारांना कधी ओळखले नाही. राज्य उत्पादन मागितले ते फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत असे म्हणायलाही लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असा घणाघातच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -