घरमुंबईप्रकाश आंबेडकरांचा इतिहास कच्चा; जितेंद्र आव्हाडांचा टोला

प्रकाश आंबेडकरांचा इतिहास कच्चा; जितेंद्र आव्हाडांचा टोला

Subscribe

शरद पवारांनी दाऊद इब्राहिमचे सरेंडर नाकारले असल्याचा आरोप करणाऱ्या भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांचा इतहास कच्चा असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अर्धवट माहितीच्या आधारे आरोप

प्रकाश आंबेडकर यांचा इतिहास कच्चा आहे, ते अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला घरात ठेवता येईल का, कायद्यात तशी तरतूद आहे का, हे प्रकाश आंबेडकर यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.

- Advertisement -

पवारांनी प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टर माईंड असलेल्या दाऊदला भारतात द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संघी गमावली असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ज्येष्ठ वकील राम जेठमलाणी यांनी दाऊद प्रत्यार्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत देखील सहभागी व्हायला तयार असल्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. मात्र शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या निर्णात यूपीए सरकार देखील सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपने देखील दाऊदला आणण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत. आज मात्र दाऊदला भारताला द्या अशी भीक मागितली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -