घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या खासदारापुढे राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांचे कडवे आव्हान

शिवसेनेच्या खासदारापुढे राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांचे कडवे आव्हान

Subscribe

शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोकसभेची हॅट्रिक साधली आहे. ते चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात असून यावेळेस मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कडवं आव्हान दिले आहे.

शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोकसभेची हॅट्रिक साधली आहे. ते चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात असून यावेळेस मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कडवं आव्हान दिले आहे. शिवसेनेतून शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सहज निवडणूक जिंकणारे आढळराव पाटील यांना यावेळी मात्र खुप मेहनत घ्यावी लागणार आहे.

हा मतदारसंघ शहरी – ग्रामीण परिसरात पसरलेला

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण परिसरात पसरलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. २००९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची चाचपणी केली होती.

- Advertisement -

कोल्हेंनी सेनेला सोडचिठ्ठी दिली 

शिरूर लोकसभा निवडणूक तोंडावर येताच खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली होती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेतून निवडणूक लढवण्यायाचे विधान केले होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्टीने माजी आमदार विलास लांडे यांना निवडणुकीच्या तयारीला लागा अस सांगण्यात आलं होतं. त्यांनी तशी तयारी देखील दर्शवली. मात्र, याच विलास लांडे यांचा शिवाजी आढळराव पाटील यांनी २००९ च्या शिरूर लोकसभा निडणुकीत पराभूत केले होते. विलास लांडे यांनी पूर्ण तयारी केल्यानंतर अचानक डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला

डॉ. अमोल कोल्हे यांचा पक्षात झाल्यानंतर भोसरी येथे पाहिल्यांदाच अमोल कोल्हे यांच्या उपस्थित जाहीर सभा घेण्यात आली. याच सभेत विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी करत विलास लांडे यांना शिरूर लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशी इच्छाच व्यक्त केली. तेव्हा अजित पवार यांनी जाहीर सभेत कार्यकर्त्यांना सुनावले होते. डॉ. अमोल कोल्हे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हे यांनी सर्व परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ज्या प्रकारे डॉ. अमोल कोल्हे यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, ते पाहता विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना लोकसभेची निवडणूक काटे की टक्कर देण्यारी ठरणार आहे. राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र अद्याप त्यांना मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीत यश मिळालेलं नाही.

- Advertisement -

पुणे-नाशिक रेल्वे, पुणे नाशिक महामार्ग, रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी, बैलगाडा शर्यतीवरील बंदी, विमानतळाचे स्थलांतर आणि पाणीटंचाई हे शिरूर लोकसभेतील कळीचे मुद्दे आहेत.

भाजपसोबतच्या युतीचा फायदा होणार 

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तत्कालीन खासदार अशोक मोहोळ यांचा पराभव केला होता. तर २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा पाऊने दोन लाख मतांनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं होतं. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तीन लाखांच्या फरकाने प्रभाव करत शिवाजी आढळराव यांनी खासदारकीची हॅट्ट्रिक साधली होती. विशेष म्हणजे पाटील यांना भाजपा सोबत करण्यात येणाऱ्या युतीचा मोठा फायदा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -