घरताज्या घडामोडीसैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण?, जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला सवाल

सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण?, जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला सवाल

Subscribe

अग्नीवीर प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. सैन्यात बहुजनांचीच मुलं जात असतात ना! आपल्या गावातला सैनिक जेव्हा शहीद होतो तेव्हा पूर्ण गाव रडतं. कारण तो आपल्यासाठी गोळ्या झेलतो.

सैन्य दलात अग्निवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजय वर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले,”जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. ” म्हणजे काय तर वॉचमॅन! या तरूणांचे नेमके काय करायचे ठरवलेय. दुसरीकडे किशन रेड्डी नावाचे केंद्रीय मंत्री म्हणतात, “या चार वर्षात त्यांना नाभिकाचे, धोब्याचे, ड्रायव्हरचे, इलेक्ट्रिशियनचे ट्रेनिंग मिळेल”. म्हणजे सैन्यात या तरूणांना नाभिक, धोबी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन बनविण्यासाठी नेणार आहात काय? हे सर्व सहा महिन्यांचे कोर्स आहेत असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

भाजपच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना अग्निपथ आणि अग्निवीर याबद्दल काहीही माहिती नाही. हा प्रकार म्हणजे देशातील तरूणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे. भारतीय सेना कंत्राटावर चालू शकत नाही. या भूमीवर ज्याचे मनापासून प्रेम आहे; परीक्षेच्या आधी जो तीन तीन वर्ष मेहनत करतो, तो अभ्यास करताना स्वप्न बघतो की आपणाला भारतीय सैन्यात जायचे आहे. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसतोय. सर्वात आधी १३० कोटी जनतेमधून एक प्रश्न राहिल की, सैन्य दलात जे कॉन्ट्रॅक्ट लेबर कारण आपण त्यांना सैनिक म्हणूच शकत नाही. त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणे, देशाला घातक ठरेल असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हा अग्नीवीर प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. सैन्यात बहुजनांचीच मुलं जात असतात ना! आपल्या गावातला सैनिक जेव्हा शहीद होतो तेव्हा पूर्ण गाव रडतं. कारण तो आपल्यासाठी गोळ्या झेलतो. अशा या देशसेवा करणाऱ्या एका वर्गाचा हा सर्वात मोठा अपमान आहे.

- Advertisement -

अमीत शहा यांनी अग्नीवीरांना दहा टक्के आरक्षण दिले जाईल, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता डॉ आव्हाड म्हणाले की कॉन्ट्रॅक्टवर सैन्यभरती करणे हे देशाच्या सुरक्षेशी द्रोह करणे आहे. ज्या तरूणाला अत्याधुनिक शस्रे चालविता येतात. त्याला जर उद्या नोकरी नाही मिळाली तर तो काय करेल? देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्यासाठी तरूण जेव्हा तीन वर्ष मेहनत करतात; पण, अग्नीवीरच्या निमित्ताने तारूण्याची टिंगल टवाळी चालू आहे. नोकऱ्या देऊ शकत नसाल तर देऊ नका, पण, सैन्यदलाची आणि तरूणांची चेष्टा करू नका असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : शिवसेनेच्या बांधणीसाठी नवीन रक्त हवंय- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -