घरमहाराष्ट्रशिवसेनेचा खरा आमदार कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करून शकत नाही - सुधीर...

शिवसेनेचा खरा आमदार कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करून शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

भाजपने विचारपूर्वक राज्यसभेसाठी तीन उमेदवार दिले होते. आमदारांच्या सद्सविवेक बुद्धीच्या आधारावर आमचा तिसरा उमेदवार निवडून आला. तर विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कारासाठी 5 वा उमेदवार उभा केला नाही, तर त्याच्या विजयासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे आम्हीच विजयी होऊ, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केले आहे.

भाजप विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केल्याची वक्तव्य करत आहेत. शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतादान करणार नाहीत, असे म्हणत असतील तर त्याचे काही चुकले नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

जनतेने त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात निवडणून दिले आहे. शिवसेनेचा खरा आमदार कधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करून शकत नाही. ज्यांना खुर्चीचे प्रेम आहे आणि जे बाळासाहेबांचे विचार विसरले असतील तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील, असे मुनगंटीवार म्हणाले.

२० जून रोजी विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. या दहा जागांसाठी एकून 11 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत असल्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये ठेवले असून भाजपाने आपल्या सर्व आमदारांना हॉटेल ताजमध्ये ठेवले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाकडून विजयासाठी आकडेमोड सुरु आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -