घरताज्या घडामोडीकांदे हे निष्ठावंत, कार्यक्षम अन्‌ कार्यसम्राट आमदार; भुजबळांच्या कानपिचक्या

कांदे हे निष्ठावंत, कार्यक्षम अन्‌ कार्यसम्राट आमदार; भुजबळांच्या कानपिचक्या

Subscribe

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यातील नाराजीनाट्यावर माजी मंत्री छगन भुजबळांनी अत्यंत मिश्किल शब्दात टिका केली आहे. कांदे हे अत्यंत निष्ठावंत, कार्यक्षम आणि कार्यसम्राट आमदार आहेत. त्यांना भुसे साहेबांनी विश्वासात घेतले पाहिजे, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (दि.15) नाशिकमध्ये असताना त्यांच्या गटातील आमदारांमधील दुरावा लपून राहिला नाही. मुख्यमंत्र्यांनीही पुरेसा वेळ दिला नाही. कदाचित दोघांमधील अंतर्गत वाद हा त्यांना फारसा महत्वाचा वाटला नसेल किंवा दिलजमाई झाली असे, या दोन्ही शक्यता आहेत. त्यामुळे पालकमंत्री भुसे आणि आमदार कांदे यांच्यात दिलजमाई झालीच नाही, अशी चर्चा आहे. याविषयी भुजबळांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घातले पाहिजे. भुसे हेदेखील सदगृहस्थ आहेत. त्यांच्याकडून अशी चूक का व्हावी. एकवेळ आम्हाला नाही विचारले तरी चालेल, पण त्यांना (कांदेंना) विश्वासात घेतले पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले. दरम्यान, छगन भुजबळ हे पालकमंत्री असताना निधी वाटपात असमानता झाली म्हणून आमदार सुहास कांदे यांनी थेट न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आमदार कांदे यांना वाढीव निधी मिळाला होता. आता पालकमंत्री बदलल्यानंतर पुन्हा अंतर्गत वाद उफाळून आल्यामुळे या प्रकरणी कोण मध्यस्थी करणार असा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -
भाई युनिव्हर्सिटीची पुन्हा आठवण

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपानंतर भुजबळ व कांदे यांच्यातील वाद ‘भाई’गिरीपर्यंत पोहोचला होता. भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य असल्याचे सांगत आमदार कांदे यांनी त्यांना थेट आव्हान दिले. तर भुजबळांनी त्यावेळी सावध पवित्रा घेत थेट आरोप न करता आमदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आता भुजबळांनी भुसे-कांदे वादाच्या निमित्ताने दोघांनाही कानपिचक्या देवून जुन्या वादाचे उट्टे काढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -