घरठाणेबेवारस गाड्यावर पोलिसांची कारवाई 

बेवारस गाड्यावर पोलिसांची कारवाई 

Subscribe
अखेर लक्ष दिल्याने नागरिक संतुष्ट  
  डोंबिवली : आधीच अरुंद रस्ते व निवडणुकांच्या धर्तीवर रस्त्यांची काढलेली कामे यामुळे कल्याण डोंबिवलीकराना चालायचे कुठून असा परष पडतो .अशातच कल्याण डोंबिवली परीक्षेत्रातील बेवारस व वर्षानुवर्षे रस्त्यावर धूळ खात पडलेल्या वाहनांवर पोलसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे . यामुळे नागरिक सुखावले आहेत . उशिरा का होईना पण जाग आल्याने प्रशासनाचे कौतूक करीत आहे . दरम्यान   वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर बेवारस स्थितीत उभ्या असणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलीस व केडीएमसीने कारवाई सुरू केली आहे.
 चारचाकी , रिक्षा , दुचाकी या व्यतिरिक्त इतर वाहने रस्त्यावर वर्षानु वर्षे बेवारस स्थितीत आढळून येतात . हि वाहने कित्येक वेळा धूळ खात तसेच दुर्लक्षित असल्याने या वाहनांच्या सभोवताली कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते . या वाहनांनाही पदपथा शेजारी अतिक्रमण केलेले असते .  वाहनाभोवती साचणाऱ्या या कचऱ्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे . त्यातच या वाहनांनमुळे  गर्दुल्ले , भिकारी यांना  देखील आश्रय मिळतो . या कडे प्रशासनांचे असणारे दुर्लक्ष कायमच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते . या वाहनामुले शहराच्या विद्रुपीकरणात देखील भर पडतो . तसेच काही वेळा गुन्ह्यांना देखील खतपाणी घालण्यात अशा वाहनांचा वापर केला जातो .  या पार्श्वभूमीवर केडीएमसी व वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी तब्बल साडेतीनशे वाहनांवर ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे.
वाहतूककोंडीला अडथळा ठरणाऱ्या या बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांनी नोटिसा लावल्या होत्या. त्यानंतर वाहन मालकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने  48 तासानी ही वाहने जप्त करत कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली वाहने महापालिकेने सुचवलेल्या पार्किंगच्या जागेवर ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी तत्काळ दंड भरून ही वाहने घेऊन जावीत तसेच यांची योग्य ती  काळजी घेत पार्क करावी असे आवाहन कल्याण डोंबिवली वाहतूक शाखेचे एसीपी संजय साबळे यांनी केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -