केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी; ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय

अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी सकाळी केतकीला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयात सुनावणीवेळी केतकीने वकिल न घेताच स्वत: युक्तीवाद केला.

Ketki Chitale granted bail in objectionable Facebook post case

अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी सकाळी केतकीला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयात सुनावणीवेळी केतकीने वकिल न घेताच स्वत: युक्तीवाद केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रविवारी सकाळी केतकीला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वीपासूनच न्यायालयाबाहेरील परिसरात राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल. राष्ट्रवादीच्या अनेक महिला कार्याकर्त्या उपस्थित होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केतकीच्या अटकेची मागणी केली जात होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीवर आतापर्यंत नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

केतकी चितळेच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आज केतकीला घेऊन पोलीस कोर्टात दाखल झाले आहेत. ठाणे कोर्टाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच इतर पदाधिकारी जमायला सुरुवात केली आहे. काही वेळात न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.


हेही वाचा – शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं सांगण्याची बाळासाहेबांवर वेळ आली नाही, दानवेंचे टीकास्त्र