घरमहाराष्ट्रभाजपमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांनाही नाही

भाजपमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांनाही नाही

Subscribe

राष्ट्रवादीच्या वाटेवर निघालेल्या भाजप नेते एकनाथ खडसे यांचा फडणविसांवर थेट आरोप

कधीकाळी आमचे नेते सामूहिक नेतृत्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. मात्र, अलिकडे एकाच व्यक्तीनं निर्णय घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची, असं स्वरुप प्राप्त झालंय. पक्षात निर्णय आधीच ठरलेला असायचा, फक्त नावापुरता विचारलं जायचं. फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर पक्षातले अनेक नेते नाराज आहेत. परंतु, हे नेते समोर येऊन बोलत नाहीत. एवढंच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्दा फडणवीसांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असा थेट आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

खडसे शुक्रवारी (दि.२३) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं ते आज मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. फडणवीसांच्या कार्यपद्धतीबाबत आणि माझ्याविरोधातील षडयंत्रांबाबत ४ वर्षात सर्व वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र कुणीही अन्याय दूर केला नसल्याची खंतही खडसेंनी व्यक्त केली. २०१४ पर्यंत गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट, भाऊसाहेब फुंडकर, मी, सुधीर मुनगंटीवार असे अनेक नेते, कार्यकर्ते एकत्र बसायचो. तासन् तास वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायचो. मग बहुमताने निर्णय व्हायचे. एकदा निर्णय झाला की मनाविरुद्ध असला तरी तो मान्य करायचो. अलीकडे ही प्रक्रिया भाजपमध्ये बंद झाली आहे, असे खडसे यांनी सांगितले.

- Advertisement -

तक्रारींचा प्रयत्न; पण ऐकून घेणारेच कुणी नाही

‘एकनाथ खडसेंना माझ्याविषयी काही आक्षेप होते तर त्यांनी वरिष्ठांकडे माझ्या तक्रारी करायच्या होत्या’, या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानालाही खडसे यांनी प्रत्युत्तर दिली. फडणवीसांच्या कार्यपद्धतीबाबत आणि माझ्याविरोधात रचण्यात आलेल्या षडयंत्रांबाबत मी गेल्या चार वर्षात सर्व वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह इतर नेत्यांकडे मी गार्‍हाणी मांडली. गडकरींकडेही अनेकदा तक्रारी केल्या. सर्वांनी निमूटपणे त्या ऐकून घेतल्या. पण कुणीही माझ्यावरील अन्याय दूर केला नाही. उलट वरिष्ठांचे तुमच्याबद्दलचे मत वाईट झाले आहे. त्यामुळे काय ते तुम्ही समजून जा, असे एका नेत्याने मला खासगीत बोलताना सांगितले, असा दावा खडसे यांनी केला.

पाटील वगळता कुणीही संपर्क साधला नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगळता माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. तेही एका कार्यकर्त्याने सांगितले म्हणून पाटलांनी संपर्क साधला. त्यामुळे पक्षात राहण्यासाठी माझी मनधरणी करण्यात आली यात काही तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -