घरमुंबईसीईटीला मुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

सीईटीला मुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

Subscribe

नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षेला मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटीची परीक्षा देण्याची संधी सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या एमएचटी सीईटी परीक्षांदरम्यान झालेली अतिवृष्टी, अचानक खंडित झालेला वीज पुरवठा आणि कोरोनाच्या समस्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य झाले नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षेला मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटीची परीक्षा देण्याची संधी सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अतिरिक्त सत्रासाठी अर्ज करायचा आहे. ही नोंदणी २२ आणि २३ ऑक्टोबर २०२० या दोन दिवशी सुरू राहणार आहे.

१ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यना एमएचटी सीईटी परीक्षेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही आणि त्यांची परीक्षा हुकली. अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही ग्रुपच्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे हॉलतिकीट आले होते, मात्र परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून अतिरक्त सत्राचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, त्यांना अतिरिक्त सत्रासाठी १०० रुपये शुल्क देखील भरावे लागणार आहेत. परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचेही सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -