घरताज्या घडामोडीKirit Somaiya : 400 कोटींच्या घोटाळ्यात तीन नेत्यांसह 5 कंत्राटदारांचा सहभाग, किरीट...

Kirit Somaiya : 400 कोटींच्या घोटाळ्यात तीन नेत्यांसह 5 कंत्राटदारांचा सहभाग, किरीट सोमय्यांचा आरोप

Subscribe

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून दोन कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी ४०० कोटींच्या घोटाळ्यात तीन नेत्यांसह ५ कंत्राटदारांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना कंत्राट देताना घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली असून चारशे कोटींच्या घोटाळ्यात तीन नेते, तीन मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि ५ कंत्राटदारांचा देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

- Advertisement -

यशवंत जाधव यांच्या घरी लगातार चार दिवसांपासून आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंगचा आरोप यशवंत जाधव यांच्यावर करण्यात येत आहे. या छापेमारीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आणि २ करोड रुपये रोख जप्त करण्यात आली असल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान ४ दिवसांच्या कारवाईनंतर यशवंत जाधव यांनी लढूया, जिंकूया आणि एकदिलाने भगवा फडकवूया अशी पहिली प्रतिक्रिया दिली होती.

- Advertisement -

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी छापेमारी केली. छापेमारीदरम्यान यशवंत जाधव यांची चौकशी सुरु करण्यात आली. अधिकाऱ्यांनी घरातून काही इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे जप्त केले आहेत. तसेच शनिवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ करोड रुपये जप्त केले आहेत. रविवारी पुन्हा महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हेही वाचा : IND vs SL : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार टीम इंडिया, कधी आणि कुठे पाहाल सामना?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -