घरमनोरंजनसंजय लीला भन्साळी आणि सलमान खान पुन्हा एकत्र येणार ?

संजय लीला भन्साळी आणि सलमान खान पुन्हा एकत्र येणार ?

Subscribe

'गंगूबाई काठियावडी' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी 'इंशाअल्लाह'ची जोरदार चर्चा रंगत होती. या चित्रपटात आलिया भट्टसह सलमान खानही झळकणार होता. पडद्यावर पहिल्यांदा सलमान आणि आलियाची जोडी एकत्र अभिनय करताना दिसणार होती.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्या मैत्री आणि वादाच्या अनेक बातम्या बी टाऊनमध्ये रंगत असतात. ‘खामोशी’  सिनेमापासून ते ‘हम दिल दे चुके सनम’ पर्यंत या जोडीने मोठ्या पडद्यावर कमाल केली आहे. पण नंतर ही जोडगोळी मोठ्या पडद्यावर पुन्हा कधीच दिसली नाही. संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यात वादाची ठिणगी पेटली असल्याचं बोललं जातं आणि दोघेही एकमेकांचे चेहरे देखील पाहू इच्छित नाही. तेव्हापासून दोघांच्याही आयुष्यता फार मोठे बदल झाले. दोघांचाही ‘इंशाअल्लाह  हा सिनेमा तयार होण्याआधीच बंद पडला. मात्र संजय लिला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाच्या भरघोस यशानंतर सलमान खान खुप आनंदीत झाला असून पुन्हा एकदा भन्साळींसोबत काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

सलमान आलिया अभिनीत ‘इंशाअल्लाह’ सिनेमा

‘गंगूबाई काठियावडी’ हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी ‘इंशाअल्लाह’ची जोरदार चर्चा रंगत होती. या चित्रपटात आलिया भट्टसह सलमान खानही झळकणार होता. पडद्यावर पहिल्यांदा सलमान आणि आलियाची जोडी एकत्र अभिनय करताना दिसणार होती. मात्र हा सिनेमा रिलीजच्या आधीच बंद पडला. सिनेमा तयारचं झाला नाही. यानंतर आलियाला भन्साळींनी ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये कास्ट केलं. आता या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सलमान खान अभिनीत ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबाबत भन्साळींनी मौन सोडले आहे.

- Advertisement -

बॉलिवूड हंगामाशी बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, सलमान माझा खूप चांगला मित्र आहे. मला त्याच्यासोबत पुन्हा काम करायचे आहे. ‘पद्मावत’नंतरही आम्ही यासाठी प्रयत्न केले. माणूस म्हणून आपण सगळेच काळाबरोबर बदलत असतो. सलमानही बदलला आहे. त्यांच्या मते मीही बदललो आहे. आम्ही आजही उत्तम पद्दतीने संवाद साधतो. माझ्या मनात सलमान बद्दल प्रचंड आदर आहे. ‘खोमशी’ या चित्रपटात त्याने माझ्यासाठी काम केलं. यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये आम्ही सोबत होतो. आज मी जो काही आहे, त्यात सलमानचा मोठा वाटा आहे.

यासह संजय लीला भन्साळी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या रिलीजनंतर असा देखील खुलासा केला होता की, या चित्रपटसाठी रणवीर सिंगऐवजी सलमान खान त्यांची पहिली पसंती होती.

- Advertisement -

हे हि वाचा –  Hema Malini Photo: हेमा मालिनी रमल्या जुन्या आठवणीत, ‘तो’ फोटो झाला व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -