घरमहाराष्ट्रविश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांची राळ उठवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्यावर खलबळजनक आरोप केले आहेत. विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावं लागतं. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. नांगरे पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवलं. ते सूचना देत होते. ते सीनियर पोलीस अधिकारी आहेत. एज्युकेटेड अधिकारी आहेत. परमबीर सिंह १०० कोटींच्या वसुलीत सहभागी. यांचा एसीपी ५० लाखांची सुपारी घेतो. अन् नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

- Advertisement -

तसंच, पुढे बोलताना सोमय्या यांनी विश्वास नांगरे पाटलांविरोधातील माझ्याकडे पुरावे असल्याचं म्हणाले. मला घरात कोंडलं होते. ते सूचना देत होते. मिहिर कोटेचा, प्रवीण दरेकरही तिथेच होते. मला नजर कैदेत ठेवण्याची ऑर्डर नसल्याचं माहीत होतं तर नांगरे पाटील यांनी मुलुंड पोलिसांवर कारवाई का केली नाही? नांगरे पाटलांना गृहमंत्री आश्वासन देत होते तर त्यांनी तसं सांगाव, असं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, कोल्हापूर जाता सोमय्या यांना अडवण्यात आलं होतं. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -