घरमहाराष्ट्रईडीची कारवाई ही तर सुरुवात आहे, किरीट सोमय्यांचा भावना गवळींना इशारा

ईडीची कारवाई ही तर सुरुवात आहे, किरीट सोमय्यांचा भावना गवळींना इशारा

Subscribe

शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawli) यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या. यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत भावना गवळी यांना इशार दिला आहे. ईडीची कारवाई ही तर सुरुवात आहे, अजून अनेक संस्था तपास करणार असं किरीट सोमय्या म्हणाले.

ईडीने भावना गवळी यांच्या संस्थांवर धाड टाकल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईवर समाधानी असल्याचं सांगितलं. भावना गवळींविरोधात ईडीची कारवाई ही तर सुरुवात आहे. यापुढे सीबीआय, बेनामी अ‍ॅक्ट, इनकम टॅक्स, डिफॉल्टर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया या सगळ्यांची कारवाई होणार आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

- Advertisement -

भावना गवळी यांनी ५५ कोटींचा कारखाना भावना अ‍ॅग्रोमध्ये बेनामी पद्धतीने विकत घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दडपणाखाली वाशीम पोलिसांनी खोटी एफआयआर नोंदवली. ७ कोटी रुपये कार्यालयातून चोरीला गेल्याचं भावना गवळी यांनी सांगितलं. आज या घटनेला १५ महिने झाले आहेत, ठाकरे साहेब उत्तर देत नाहीत की ७ कोटी आले कुठून? यासंबंधात मी ईडी, बेनामी संपत्ती अ‍ॅक्ट, इनकम टॅक्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अर्थ मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्राच्या सहकार मंत्रालय यांच्याकडे मी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

ईडीकडून भावना गवळींच्या ५ ठिकाणांवर धाडी

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे. अधिक माहितीनुसार, शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. याची दखल घेतात ईडीने भावना गवळी यांच्या यवतमाळ-वाशिम इथं असलेल्या पाच संस्थांवर धाडी टाकल्या.

- Advertisement -

हेही वाचा – सत्तेत नसल्याने भाजपची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी झालीये – नाना पटोले


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -