घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon: राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon: राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून  पावसाने दांडी मारल्यानंतर आता पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तसेच पूर्व- पश्चिमेकडून या दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पुढील दोन दिवस उत्तर कोकण,उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.(Maharashtra Monsoon update)

उद्या आणि परवा मुंबई,ठाणे,पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर ठाणे आणि रायगडमध्ये उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलं आहे.

- Advertisement -

कोकण विभागात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर उद्या नाशिकमध्ये देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वदर्भात 30 ऑगस्ट पासून ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हवमान विभागा तर्फे संपूर्ण विदर्भात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चंद्रपुर,गोंदिया,गडचिरोली,भंडारा,नागपूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर् अमरावती ,अकोला वाशिम,यमवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसू शकतात असा अंदाज देण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसापासून दडी मारुन बसलेल्या पावसामुळे हवमानात उष्णता उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत होते. मात्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण होणार आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या पश्चिमेकडील काही भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरांमध्ये पुढील २४ तास संततधार पाऊस सुरु राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस (१५ सेंटीमीटरपेक्षा कमी) पडण्याची शक्यता आहे, असं सांगण्यात आलंय.


हे हि वाचा – krishna janmashtami 2021:…तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करू; मनसे आक्रमक

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -