घरमहाराष्ट्रकोल्हापुरात रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग; २ रूग्णांचा मृत्यू

कोल्हापुरात रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग; २ रूग्णांचा मृत्यू

Subscribe

कोरोना संसर्गामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर ट्रामा केअर सेंटरमध्ये सुरू होते उपचार

कोल्हापुरात असलेल्या सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरला भीषण आग लागल्याचे समजतेय. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये आग लागल्याने आगीचा धूर होता.

अशी घडली घटना

सोमवारी पहाटे सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आग लागल्याची ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये दोन रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या वॉर्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते. या दुर्घटनेत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहिती नुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पहाटे सीपीआर रुग्णालयात जाऊन घटनास्थळाची पहाणी केली.


लॉकडाउन काळात हृदयविकारावर १०० यशस्वी शल्यचिकित्सा 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -