घरमहाराष्ट्रकोल्हापुरात पूरग्रस्त महिलांच्या पंचगंगा नदी पात्रात उड्या

कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांच्या पंचगंगा नदी पात्रात उड्या

Subscribe

मायक्रो फायनान्सची कर्जे माफ व्हावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या घेतल्या आहेत.

मायक्रो फायनान्सची कर्जे माफ व्हावीत या मागणीसाठी छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या वतीने अनेकदा आंदोलन करण्यात आली. मात्र, अनेक वेळा आंदोलने करुनही देखील प्रशासनन दखल घेत नसल्यामुळे महिलांनी तावडे हॉटेल इथ पंचगंगा नदी पात्रात बेमुदत उपोषण सुरु केले. परंतु, आज आंदोलन चिघळताना दिसले. नदी पात्रात बेमुदत उपोषण करुन देखील प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने आज महिलांनी नदी पात्रात उड्या घेतल्या. तसेच हा सर्व प्रकार हातकणंगलेचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी तातडीने नदीमध्ये उड्या घेत महिलांना पाण्यातून बाहेर काढले. या सगळ्या प्रकारात एक महिला आंदोलक बेशुद्ध पडली असून याप्रकरणी काही महिलांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

गेल्या काही महिन्यापूर्वी अवकाळी पावसाने कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी महिना दोन महिने महिलांकडे काम नसल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज माफ करावे अशी मागणी हजारो महिलांकडून केली जात आहे. तसेच याकरता शिरोळ तालुक्यातील महिलांनी छत्रपती शासन महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आता हा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या हातात नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मायक्रो फायनान्सची कर्जमाफी द्यावी. अन्यथा जससमाधी घेऊ असा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत मुख्यमंत्री आंदोलकांशी चर्चा करत नाहीत अथवा कर्जमाफीचा आदेश काढत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या दिव्या मगदूम यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न खासदार धैर्यशील माने यांनी केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘काँग्रेसच्या पाकिस्तानी वृत्तीचा निषेध’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -