घरमहाराष्ट्रBhima Koregaon : प्रा. तेलतुंबडेंची याचिका फेटाळली

Bhima Koregaon : प्रा. तेलतुंबडेंची याचिका फेटाळली

Subscribe

भीमा - कोरेगाव हिंसेप्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. पण, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

भीमा – कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नक्षल्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांना धक्का बसला आहे. भीमा – कोरेगाव हिंसेप्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. पण, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देखील दिली आहे. मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीमध्ये सहभागी झालेला नाही. भीमा – कोरेगावमधील हिंसाचाराशी माझा संबंध नाही. असा दावा प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला होता. त्यामुळे FIR रद्द करावा असं त्यांनी या याचिकेमध्ये म्हटलं होतं. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र ही याचिका फेटाळून लावली आहे.

गेल्या वर्षी पुण्यामध्ये ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली. त्यानंतर १ जानेवारीला भीमा  – कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारामागे नक्षल्यांचा हात आहे. शिवाय नक्षल्यांशी काही मानवाधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा संबंध आहे. असा आरोप ठेवत पुणे पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हे देखील नोंदवले आहेत. त्यामध्ये प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा देखील समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -