घरमुंबईशिवरायांच्या नाण्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान

शिवरायांच्या नाण्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळाले आहे. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये शिकणाऱ्या रुपल सावंत हिने ही किमया करून दाखवली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाण्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळाले आहे. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये शिकणाऱ्या रुपल सावंत हिने ही किमया करून दाखवली आहे. जपान मिंटच्यावतीने घेण्यात आलेल्या दि इंटरनॅशनल कॉइन डिझाईन कॉम्पिटिशन २०१८ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणे रचना स्पर्धा २०१८ मध्ये रुपलने सहभाग घेतला असून या स्पर्धेत तिने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र तसेच त्यांची कीर्ती दर्शवणारी रचना मांडली. या रचनेला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

मराठमोळ्या रुपलची मोठी झेप

जे. जे. स्कूल ऑफ आर्टसची विद्यार्थीनी रुपलने ही झेप घेतली असून फेब्रुवारी महिन्यात जपानमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. त्यासाठीची तयारीही रूपल आणि तिच्या कुटुंबीयांनी सुरू केली आहे. रूपलला भविष्यात इंटेरियर डिझायनर म्हणून नावारूपाला यायचे आहे. कलाविश्वात वेगळा ठसा उमटवण्याची तिची जिद्द तिला कधीच स्वस्थ बसू देत नसल्याचे ती सांगते. याच उर्मीतून तिने ‘आंतरराष्ट्रीय नाणे रचना स्पर्धा २०१८’ मध्ये सहभाग घेतला. त्यासाठी तिचे मामा दीपक कदम आणि तिचे शिक्षक मुंबई कला महाविद्यालयाचे प्राचार्य मुकेश पुरो सर यांनी तिला प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले. मामा दीपक हे स्वतः शिल्पकार असल्यामुळे घरात कलेचे वातावरण आहे. त्यातूनच तिला प्रेरणा मिळाली आणि तिने जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला, असं ती सांगते.

- Advertisement -

पुरस्कार पटकावणारी पहिली महिला

या पुरस्कारावर आतापर्यंत पुरुष शिल्पकारांनीच मोहोर उमटवली आहे. हे नाणे तयार करण्यासाठी सहा महिने लागतात. तसेच ते तयार करण्यासाठी प्रचंड संयम लागतो. त्यामुळे या स्पर्धेत महिला कधीच सहभाग घेत नाहीत. परंतु यंदा रूपल सावंतने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -