घरमहाराष्ट्रपुणेLalit Patil Drug Case : ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

Lalit Patil Drug Case : ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक

Subscribe

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केले आहे. ससून रुग्णालयात ललित पाटील उपचार घेत असताना हा कर्मचारी मदत करत होता. हा कर्मचारी हा सतत ललित पाटीलच्या संपर्कात होता. पोलिसांनी अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव महेंद्र शेवते असून हा कर्मचारी शस्त्रक्रिया विभागात कार्यकरत होता.

ससून रुग्णालयातील ललित पाटील यांच्या 16 नंबर वॉर्ड उपचार घेत असताना, रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुवा म्हणून महेंद्र शेवते काम करत होता. महेंद्र शेवते हा सतत 16 नंबर वॉर्डमध्ये ये जा करत होता. ललित पाटीलला अटक केल्यानंत 16 नंबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 10 ते 12 नर्सेसकडे चौकशई केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केले आहे. ललित पाटील प्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळाले की, हा कर्मचारी रुग्णालयात दाखल झालेला इतर कैद्यांना देखील मदत करत असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दाखल करून घेण्यास ससून रुग्णालयाचा नकार

ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे आणि ललित पाटीलला पळवून लावण्यात रुग्णालयाचा हात असल्याचेही अनेकांनी दावा केला आहे. ललित पाटीलला प्रकरणी मी पळालो नाही तर पळवून लावले, या सर्व घटनाक्रमावरून ससून रुग्णालय हे वादाच्या भोवऱ्यात अडकले. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आणि डॉ. देवकाते यांची उचलबांगडी देखील करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – ललित पाटील प्रकरण: “कोणाची गय केली जाणार नाही”,अजित पवारांची भूमिका

ललित पाटीलला पोलिसांनी असे केले अटक

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला हा 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळून गेला. यानंतर तीन तासानंतर कंट्रोल रुमला ललित पाटील पळून गेल्याची माहिती मिळाली. ललित पाटीलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके नेमण्यात आली होती. ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील हा चेन्नईत लपून बसला होता. अखेर मुंबई ललित पाटीलला पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी पकडण्यात यश आले.

हेही वाचा – ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट; आणखी चार जणांची नावं समोर

वार्ड नंबर 16 तील पोलिसांना देत होता पैसे

मी पळालो नाही तर मला पळवून लावले,एवढेच नाही तर मी सगळ्यांची नावे सांगणार, असे ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हटला होता. ललित पाटीलच्या वक्तव्याने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कारागृहात होता. मात्र, तो उपचाराचे कारण देत ससून रुग्णालयातच होता. या दरम्यान तो हवे तसे कुठेही फिरत होता. ससून रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. त्यासाठी ललित पाटील महिन्याला 17 लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली. 16 नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तो पैसे देत होता हेसुद्धा आता उघड झाले आहे, असे अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -