घरमहाराष्ट्रMLC study tour to Japan : विधिमंडळाच्या यादीत ठाकरे गटाच्या आमदारांचा शिवसेना...

MLC study tour to Japan : विधिमंडळाच्या यादीत ठाकरे गटाच्या आमदारांचा शिवसेना असा उल्लेख

Subscribe

आजपासून राज्यातील विधिमंळाचे २७ सदस्यांचे शिष्टमंडळ हे जपानच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे.

आजपासून राज्यातील विधिमंळाचे २७ सदस्यांचे शिष्टमंडळ हे जपानच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिष्टमंडळात समावेश असलेल्या ठाकरे गटाच्या आमदारांचा देखील शिवसेना आमदार म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे.

२७ सदस्यांच्या आमदारांचे हे शिष्टमंडळ अभ्यासासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या आमदारांचा समावेश करण्यात आलेला आहे. ११ एप्रिल ते २१ एप्रिल असे १० दिवस हा अभ्यास दौरा असणार आहे. या यादीत ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले या आमदारांचा समावेश करण्यात आलेला आहे. पण या आमदारांचा शिष्टमंडळाच्या यादीत उल्लेख करताना शिवसेना असे लिहिण्यात आलेले आहे. ज्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षाचे आमदार वेगवेगळ्या नाही तर एकाच पक्षाचे सदस्य म्हणून या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून आणखी कोणते नवे राजकारण होणार की वाद होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जपानला रवाना होणार आहे. त्यात माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, श्वेता महाले, राजहंस सिंह, रमेश पाटील, ज्ञानराज चौगुले, किशोर पाटील, मनिषा कायंदे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, चेतन तुपे, विक्रम काळे, लहू कानडे, संजय जगताप, बळवंत वानखेडे, जयंत आसगांवकर आणि क्षितीज ठाकूर या विधानसभा तसेच विधान परिषद सदस्यांचा समावेश आहे. तसेच, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दौऱ्यावर काँग्रेसचे सर्वाधिक आमदार जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान, आता या अभ्यास दौऱ्याच्यामध्ये हे शिष्टमंडळ बुलेट ट्रेनमधून देखील प्रवास करणार आहेत. त्यामुळे हा अभ्यास दौरा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यासंदर्भातील एक यादी विधिमंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले या चारही आमदारांचा उल्लेख शिवसेना असाच करण्यात आला आहे. वास्तविक यातील दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्या तर अन्य दोन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पाटलांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राजीनामा द्या; मुख्यमंत्री शिंदेंना राऊतांचा खोचक सल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -