घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांच्या 'या' वक्तव्यामुळे संजय राऊत संतापले; वाचा सविस्तर

चंद्रकांत पाटलांच्या ‘या’ वक्तव्यामुळे संजय राऊत संतापले; वाचा सविस्तर

Subscribe

बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 'त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

बाबरी मशीद पाडण्यात (Babri Masjid Demolition) एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ‘त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘झी 24 तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. (Chandrakant Patil Statement Balasaheb Thackeray Babari Demolish Shivsena)

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

- Advertisement -

“त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही 3 राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असं सांगितलं होतं. मी बाहेर पडलो तेव्हा अयोध्येच्या रस्त्यावर”, असे सांगितलं.

- Advertisement -

“अशा वातावरणात काम केलेले आम्ही. त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी मी घेतो म्हणून तुम्ही काय तुमचे चार सरदार तिथे पाठवले होते का?” असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.


हेही वाचा – सावरकरांचा जन्मदिवस “स्वातंत्र्यवीर गौरव दिन” म्हणून साजरा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -