घरमहाराष्ट्रसोलापूर भाळवणी बिबट्याची दहशत

सोलापूर भाळवणी बिबट्याची दहशत

Subscribe

भाळवणी परिसरात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. येथील शेतकरी अनंता लक्ष्मण सराटे-पाटील यांच्या घरासमोरील दोन शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने रात्री त्यांना फस्त केले.

सोलापूर तालुक्यातील भाळवणी परिसरात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. येथील शेतकरी अनंता लक्ष्मण सराटे-पाटील यांच्या घरासमोरील दोन शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने रात्री त्यांना फस्त केले. सराटे-पाटील यांनी गाई, म्हैस व शेळ्या घरासमोरील अंगणात बांधल्या होत्या. सोलापूरमध्ये थंडीचा पारा वर चढल्यामुळे रात्री त्यांनी दरवाजे बंद केले होते. सकाळी त्यांना आपल्या दोन्ही शेळ्या सापडल्या नाही. या शेळ्यांना शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांना बिबट्याचे निशान दिसले. तेव्हा बिबट्याने शेळ्या पसार केल्याचे आढळले आहे .

अफवा पसरवू नये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रात्री थंडी असल्यामुळे दार बंद करून ते घरात झोपले होते. सकाळी उठल्यावर त्यांना दोन शेळ्या दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आसपास पाहिल्यावर दोन शेळ्या मरून पडलेल्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. शेळ्या फस्त केल्याची बातमी समजल्यावर वनविभागाचे आधिकारी एस. डी. बुरुगुळे व पशुवैद्यकीय आधिकारी सातपुते घटनासथळी दाखल झाले. त्यांना बिबट्याच्या पायांचे ठसे दिसले. त्यामुळे भाळवणीसह परिसरातील गावांत दहशतीचे वातावरण आहे. भाळवणी ग्रामपंचायतीने बिबट्यासारख्या प्राण्यापासून सावधगिरी बाळगून काळजी घेण्याचे आवाहन करत तसा प्राणी दिसल्यास ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा आवाहन केले आहे. यावेळी वनआधिकारी बारगुळे म्हणाले, बिबट्या पासून सावध राहिले पाहिजे. शेतात रात्री एकटे जाऊ नये. रात्री लाइटचा वापर करावा. फटाके वाजवावेत. आवाज,गोंधळ करावा. याबरोबरच अफवा पसरवू नये,असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -