घरमहाराष्ट्रअखेर बिबट्याची झाली सुटका

अखेर बिबट्याची झाली सुटका

Subscribe

खेडशी या गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याची अखेर सुटका झाली.

जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या आता दबक्या पाऊलांनी शिकारीच्या शोधात लोकवस्तीत येऊ लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडशी येथे एक बिबट्या परिसरात वावरत होता. त्या दरम्यान त्याचा पाय घसरुन हा बिबट्या आज सकाळी एका विहिरीत पडला. हा बिबट्या बाहेर येण्याचा आतोनात प्रयत्न करत होता. मात्र या बिबट्याला बाहेर येता आले नाही. अखेर बिबट्याला वनविभागाने विहिरीत पिंजरा टाकून बाहेर काढले. हा बिबट्या नर जातीचा आहे.

नेमके काय घडले?

खेडशी येथे गुरुवारी मध्यरात्री भक्ष्यचा पाठलाग करत होता. पाठलाग करत असताना हा बिबट्या रोहित चव्हाण यांच्या विहिरीत पडला. विहिरीत बिबट्या पडल्याचे पाहताच बिबट्याची बाहेर येण्याची तळमळ पाहून ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाचे पथक शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता पोहोचले. त्यानंतर वनविभागाच्या पथकांने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे. वनविभागाचे एस. बी. गुरव, सुरेश उपरे, कीर, परमेश्वर डोईफोडे, मिताली कुबल, राहुस गुंठे, न्हानू गावडे, पी.जी.पाटील यांनी बिबट्याला बाहेर काढले आहे.

- Advertisement -

वाचा – आंबेगावमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद

वाचा – अहमदनगर- कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -