घरदेश-विदेशLive Update : नागपुरात सेमिनरी हिल परिसरात एका घराला भीषण आग

Live Update : नागपुरात सेमिनरी हिल परिसरात एका घराला भीषण आग

Subscribe

नागपुरात सेमिनरी हिल परिसरात एका घराला भीषण आग

आगीत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू

- Advertisement -

————–

वडोदरात तलावात बोट उलटली विद्यार्थ्यांसह 16 जणांचा मृत्यू

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईची घोषणा केली

गुजरातमधील वडोदरा येथे हर्णी तलावात बोट उलटली. बोर्डात 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते.

मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

बोटीत 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे. काहीजण बेपत्ता आहेत.

—————————

परिवहन विभागाच्या बसवर दगडफेक

हिंगोलीच्या नांदगाव-औंढा मार्गावरील घटना

दगडफेकीमागील कारण अद्याप अस्पष्ट

—–

मालाडमध्ये अनधिकृत स्टुडिओवर पालिकेची कारवाई

मुंबई महापालिकेकडून मध्यंतरी मालाड, मढ येथील अनधिकृत स्टुडिओवर जोरदार कारवाई करण्यात आली होती.

मात्र त्यानंतरही सदर परिसरात पुन्हा एकदा अनधिकृतपणे स्टुडिओ उभारल्याने निदर्शनास आल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने या ठिकाणी गुरुवारी धडक देवून जोरदार कारवाई करून अनधिकृत स्टुडिओ पाडून टाकला आहे

———

रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी रेल्वे रोको आंदोलनाच्या तयारीत असलेले रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात

राजूर घाटातून घेतले ताब्यात


राजन साळवींची आजची चौकशी संपली

आता पुढील कारवाईकडे लक्ष

बेनामी संपत्ती प्रकरणी एसीबीचा छापा


सूरज चव्हाणला पाच दिवसांची ईडी कोठडी

ठाकरे गटाला आणखी एक धक्का

ईडीने मागितली होती आठ दिवसांची कोठडी


खिचडी घोटाळा प्रकरणाची सुनावणी संपली

कोरोना काळातील खिचडी घोटाळा प्रकरण

कोर्टातील सुनावणी संपली, थोड्याच वेळात कोर्ट देणार निर्णय


ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल

साळवींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक, ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी


राणा दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई सत्र न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर

रे नगर प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


21 जानेवारीला टाटा मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वे दोन विशेष लोकल चालवणार

पहाटे 3 वाजता कल्याण येथून विशेष लोकल सोडण्यात येणार असून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई 04.30 वाजता येथे पोहोचेल.

पनवेल येथून 03.10 वाजता लोकल निघून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 04.30 वाजता पोहोचेल.


राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी

22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर


राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल

पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाल्याने राजन साळवी संतापले

या गुन्ह्याचा परिणाम सरकारला भोगावा लागण्याचा दिला इशारा


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले राम मंदिर पोस्टल तिकिटाचे प्रकाशन


मुंबईत अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा

षण्मुखानंद सभागृहात सुरू असलेल्या मेळाव्याला अजित पवार उपस्थित

भावी मुख्यमंत्री अजित पवार, महिलांनी परिधान केल्या टोप्या


पाकिस्तानचा इराणवर हल्ला

काल इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानवर केला होता क्षेपणास्त्र हल्ला

या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने केला असल्याची माहिती


बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांची सुप्रीम कोर्टात धाव

गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यासाठी हवी आहे मुदतवाढ

याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टात दर्शवली सहमती


एसीबीचे पथक राजन साळवींच्या रत्नागिरीच्या घरी दाखल

आतापर्यंत सहा वेळा एसीबीकडून राजन साळवींची चौकशी

साळवींच्या घराची एसीबींकडून झाडाझडती


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किल्ले शिवनेरी दौऱ्यावर

21 जानेवारीला करणार शिवनेरीचा दौरा

शिवनेरीवरील माती काळाराम मंदिरात घेऊन जाणार

शिवनेरी दौऱ्यानंतर आदित्य ठाकरेंची सभा


जालना औद्योगिक वसाहतीत जीएसटी पथकाचे छापे

गीताई आणि रुपम स्टील कंपनीमध्ये जीएसटीचे छापे

दोन स्टील कंपन्यांवर केंद्रीय जीएसटी पथकाकडून छापे


बदलापूर खरवई एमआयडीसीमधील कंपनीमध्ये भीषण स्फोट

स्फोटात चार ते पाच कामगार गंभीर जखमी

एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे चार वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भीषण आग

आगीमुळे कंपनीमध्ये चार ते पाच मोठे स्फोट


राज्यात कोरोना संसर्गामुळे एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात बुधवारी नव्या 81 रुग्णांचे निदान

15 ते 17 जानेवारी या दोन दिवसांमध्ये राज्यात करोनाच्या 179 रुग्णसंख्येची नोंद


चिन्नास्वामीवर झालेल्या ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाल्या असतील दोन सुपर ओव्हर

भारताने अफगाणिस्तानचा टी20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 पराभव करत मिळवला विजय

कर्णधार रोहित शर्माने झळकावले पाचवे शतक

रिंकू सिंगच्या साथीनं रचलेली 190 धावांची अभेद्य भागीदारी भारताच्या सलग तिसऱ्या विजयात ठरली निर्णायक


क्रेनच्या मदतीनं राम मंदिर परिसरात पोहोचली रामलल्लाची मूर्ती

अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकची तयारी जोरात सुरू

बुधवारी राम मंदिर परिसरात पोहोचली रामलल्लाची मूर्ती

गुरुवारी ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती

आता ही मूर्ती मंदिरातील गर्भगृहाच्या दारात असल्याची माहिती


युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक

बीएमसी कथित खिचडी कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

सुरज चव्हाण यांची याप्रकरणी याआधी झाली होती चौकशी

सुरज चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चौकशी केली जात होती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -