घरदेश-विदेशLive Update : महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे गुरुवारी वितरण

Live Update : महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे गुरुवारी वितरण

Subscribe

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे गुरुवारी वितरण

अशोक सराफ यांना प्रदान होणार

- Advertisement -

राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार येत्या 22 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे

तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना समारंभपूर्वक प्रदान  करण्यात येईल

- Advertisement -

अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे


चार लाखांहून अधिक हरकती, सूचना प्राप्त

सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम 2000 नियम 2012 मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसूचना 26 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती

यासंदर्भात 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती, सूचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती

सामाजिक न्याय विभागाकडे 16 फेब्रुवारीपर्यंत अंदाजित सुमारे चार लाखांहून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत


प्रसिद्ध उर्दू कवी, चित्रपट गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार

संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार


नवी मुंबईतील तुर्भेत कंपनीला आग

अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

आगीचे कारण अस्पष्ट, नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू


मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे चिरंजीव नकुलनाथ भाजपामध्ये प्रवेश करणार

काँग्रेला मध्य प्रदेशात मोठा धक्का


दिल्लीत मालगाडीचे 10 डबे रुळावरून घसरले

जाखिरा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती

रेल्वे, अग्निशमन दल आदींचे पथक घटनास्थळी दाखल

मालगाडीत लोखंडी पत्र्यांचे रोल्स भरण्यात आले होते. या अपघातानंतर बचावकार्य सुरू आहे.


बोईसर तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग

12 वाजताच्या सुमारास कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती

आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू गेटजवळचा मोठा मंडप कोसळला

मंडपाखाली अनेकजण अडकल्याची भीती

दुर्घटनेत आठ जण जखमी


नाशिक – मुंबई महामार्गावर मराठा समाजाचा रास्तारोको

रास्तारोको करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात


नांदेड-परभणी महामार्गावर रास्तारोको

रास्तारोकोमुळे कालपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा


भाजपाचे दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला देशभरातील नेतेमंडळी राहणार उपस्थित


गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

शरद पवार सकाळीच गोविंद बागेतील कार्यालयात दाखल


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाचा आज आठवा दिवस

मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरे कायदा करण्यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण आज आठव्या दिवशी सुरूच राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जरांगेंना उपोषण मागे घेण्याचे केले आवाहन

सगेसोयरे या शब्दाबद्दल कायदा निघेपर्यंत मनोज जरांगे आपल्या आंदोलनावर ठाम


शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी राहणार बंद

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी प्रशासनाचा निर्णय

एकूण दहा तासांसाठी न्हावा शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी


नांदेडमधील काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीची तोडफोड

नांदेडमधील पिंपळगाव येथे घडली घटना

मराठा आंदोलकांनी हंबर्डे यांची कार फोडली असल्याची माहिती

आमदार हे पिंपळगाव निमजी गावात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले असताना घडली घटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -