घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार 17 फेब्रुवारी 2024

राशीभविष्य : शनिवार 17 फेब्रुवारी 2024

Subscribe

मेष – सकाळीच महत्त्वाचे काम करा. घरातील सदस्यांशी तुमचा वाद होईल. मुलांची मदत घेता येईल. संयम ठेवा.

वृषभ – अडलेले काम करून घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisement -

मिथुन – धंद्यात वाढ होईल. नोकरीत वर्चस्व राहील. चिंता करण्यापेक्षा कामात लक्ष द्या. कामात सहकारी मदत करतील.

कर्क – आज संध्याकाळी एखादी चांगली घटना घडेल. प्रवासात घाई नको. वाहन हळू चालवा. महत्त्वाची वस्तू नीट ठेवा.

- Advertisement -

सिंह – सकाळी महत्त्वाचे काम करा. चर्चा सफल होईल. नोकरीत बदल करता येईल. धंद्यात नवे काम मिळेल.

कन्या – तुमच्या कामात यश मिळेल. डावपेच यशस्वी होतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. धंद्यात फायदा होईल. मित्र वाढतील.

तूळ – कामात तुमच्यावर दबाव येईल. संयम बाळगा. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. गोड बोलण्यावर भाळूून जाल.

वृश्चिक – दुपारनंतर तुम्हाला चांगली प्रेरणा मिळेल. विरोध मोडून काढता येईल. धंद्यात आळस नको. कष्ट करा. यश मिळेल.

धनु – सकाळीच सरकारी कामे करा. तब्येतीची काळजी घ्या. औषध वेळेवर घ्या. भावनेच्या आहारी जाऊ नका. सावध राहा.

मकर – घरात रागाचा पारा वाढेल. आपल्या सदस्यांवर हात उचलू नका. प्रेमाने बोला. शांत राहा. संध्याकाळी मार्ग शोधता येईल.

कुंभ – कामातील व्याप वाढल्याने किरकोळ तणाव संभवतो. पत्नी, मुले यांची मर्जी राखावी लागेल. खर्च होईल.

मीन – अपेक्षित व्यक्ती भेटेल. अडलेले काम होईल. आळस करू नका. मागील येणे वसूल करा. धंद्यात वाढ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -