घरक्रीडाLive Update : ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी विजेती, भारताचा दारूण पराभव

Live Update : ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी विजेती, भारताचा दारूण पराभव

Subscribe

11/6/2023 16:54:49ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी विजेती, भारताचा दारूण पराभव

11/6/2023 16:43:32 काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड सिद्धीविनायक चरणी

- Advertisement -

11/6/2023 15:47:11 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पैठणमध्ये दौऱ्यावर

छत्रपती संभाजीनगर पैठण रस्त्याच्या विस्तारीकरणादरम्यान तोडण्यात आलेल्या 51 वडाच्या झाडांचे पुनररोपन करण्यात आले होते

या झाडांना पालवी फुटली असून या झाडांची पाहणी नितीन गडकरी करणार आहेत 


11/6/2023 14:58:44 लोकसभा निवडणूका ऑक्टोबरमध्ये लागल्या तर नवल वाटू नये – प्रकाश आंबेडकर

- Advertisement -

भाजप भीतीचं वातावरण तयार करून निवडणूक जिंकू पाहतयं असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला


11/6/2023 14:58:44 उगाच मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही – अजित पवार


11/6/2023 14:30:49 मान्सुन महाराष्ट्रात दाखल

मान्सुननं दक्षिण कोकणातील भाग व्यापला आहे

मान्सूनचे आगमान झाल्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे


11/6/2023 14:5:54 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिन्हांच्या भेटील

एकनाथ शिंदे श्रीनगरमधील राजभवनात दाखल


11/6/2023 13:53:29 “पिळवणूक करणाऱ्यांच्या हाती सत्ता देता तर माझ्याकडे येता कशाला?” – राज ठाकरे

मनसेच्या कामांचं कौतुक होतं मग मतदान का करत नाहीत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला

मनसे रस्ते, साधन सुविधा विभागाच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे प्रभादेवी येथील कार्यक्रमात उपस्थित होते


11/6/2023 12:41:43 भाजपने विरोधकांना संपवण्याआधी स्वत:सोबत असणाऱ्या सहकारी पक्षाला संपवले – सुप्रिया सुळे

आता विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला


11/6/2023 11:4:4 कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुप्रिया सुळे थेट पुण्यात

अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुप्रिया सुळे यांच्याकडून नागरिकांच्या ,कलाकारांच्या, उद्योगपतींच्या, भेटीगाठीला सुरुवात

राहुल देशपांडे देखील सुप्रिया सुळे यांच्या भेटीला 


11/6/2023 11:4:4 बॉलिवूड अभिनेता साहिल खान आणि इतरांविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

अभिनेता साहिल खान वर सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप आहे

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला

अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही


11/6/2023 9:54:0 कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून भाजपा निवडणुकीच्या प्रचारात – संजय राऊत

अमित शहांच्या डोक्यात अजूनही ठाकरे आणि शिवसेनेचं भय कायम

महाराष्ट्रातील जनतेचा अमित शहांपेक्षा ठाकरेंवर अधिक विश्वास ठेवते

शहांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपने चिंतन करायला हवे

भाजपने केलेल्या चक्रव्यूहात सध्या तेचं अडकले आहेत

कोल्हे आणि लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत आहेत, पण शिवसेना आणि ठाकरे हे खरे वाघ आहेत


11/6/2023 9:52:26 ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाच्या तपासासाठी बहनगा रेल्वे स्थानक बंद

ओडिशातील रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयने हाती घेतली आहे.

पुढील आदेशापर्यंत बालोसर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही रेल्वेगाडी थांबणार नाही

सीबीआयने हे स्थानक आपल्या ताब्यात घेऊन इथलं लॉग बुक आणि उपकरणं तपासासाठी जप्त केली आहेत


11/6/2023 7:32:51 झारखंडमध्ये बंदचा आज दुसरा दिवस

झारखंड स्टेट स्टुडंट्स युनियनने (JSSU) राज्य सरकारच्या 60-40 फॉर्म्युल्यावर आधारित नवीन भरती धोरणाविरोधात संप सुरू केला आहे

बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे


11/6/2023 7:22:47 भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा सामन्याचा आज शेवटचा दिवस

भारताला विजयासाठी 280 धावांची गरज

भारत विजय मिळवून इतिहास घडवणार की सामना ड्रॉ करणार याकडे सर्वांचे लक्ष


11/6/2023 7:22:47 पालखी सोहळ्या दरम्यान पुणे शहरात ड्रोनवर बंदी

12 जून ते 15 जून दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यावर शहरात बंदी घालण्यात आली आहे

पुणे पोलिसांकडून ही बंदी घालण्यात आली आहे

पोलीस या काळात ड्रोनवर विशेष लक्ष ठेवणार असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -