घरताज्या घडामोडीलोहगाव विमानतळ १४ दिवस राहणार बंद!

लोहगाव विमानतळ १४ दिवस राहणार बंद!

Subscribe

लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस बंद राहणार आहे.

लोहगाव विमानतळ एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस बंद राहणार आहे. लोहगाव विमानतळावरील धावपट्टीवर रिसरफेन्सिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये १४ दिवस विमानसेवा बंद राहणार असल्याची माहिती पुणे विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे या फटका विमानप्रवाशांना बसणार आहे. त्यामुळे विमानाचे तिकिट बुकिंग करण्यापूर्वी प्रवाशांना तारखांचे पाहून बुकिंग करावे लागणार आहे.

यावेळेत उड्डाणे बंद

लोहगाव विमानतळावरील उड्डाणे सध्या सकाळच्या वेळेस सुरु आहेत. मात्र, रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ही विमानसेवा बंद राहणार आहे. दरम्यान, लोहगाव विमानतळावर २६ एप्रिल ते ९ मे २०२१, असे १४ दिवस धावपट्टीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे येथील विमानतळावरील सेवा बंद राहणार असल्याचे पुणे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले आहे. त्यामुळे आगाऊ तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनी तारखा लक्षात घेऊन विमानाचे बुकिंग करावे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रवाशांसाठी खुशखबर; वाया गेलेल्या रेल्वे पासचे दिवस मिळणार वाढवून


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -