घरमहाराष्ट्रLok Sabha : मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार; राहुल गांधींकडून...

Lok Sabha : मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार; राहुल गांधींकडून घोषणा

Subscribe

मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (24 एप्रिल) संपत असल्याने येथील आठ मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभा होत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकावर निशाणा साधला. मोदींनी अब्जाधीश बनवले, आम्ही कोट्यवधी लखपती घडवणार, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणाही केल्या. (Lok Sabha Election 2024 Narendra Modi made billionaires we will make crores of millionaires Rahul Gandhi)

परतवाड्यातील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने देशातील ठराविक उद्योगपतींच 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं, मात्र गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही. परंतु काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास देशातील कोट्यवधींना लखपती बनविण्यात येणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात अगोदर महालक्ष्मी योजना लागू करण्यात येईल. त्यानुसार, देशातील गरीब कुटुंबांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव निवडलं जाईल. त्या महिलेच्या बँक खात्यात इंडिया आघाडीचं सरकार वर्षाला 1 लाख रुपये टाकेल. तर, महिन्याला 8 हजार 500 रुपये देशातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. अंगणवाडीच्या महिलांना दुप्पट पगार दिला जाईल, अशी घोषणा राहुल गांधींनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Sam Pitroda : वारसा करासंदर्भात सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वाद; भाजपा-काँग्रेसकडून दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण

श्रीमंतांच्या मुलांप्रमाणे गरीबांच्या लेकरांना सुविधा देणार (The children of the poor will be given facilities like the children of the rich)

नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींनी देशातील युवकांना 2 कोटी नोकरीचं अमिष दाखवलं. मात्र, गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आज भारतात आहे. गरिबांची लेकरं नोकरीच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे देशातील श्रीमंत लोक आपल्या मुलांना जी सुविधा देतात, तीच सुविधा आम्ही गरिबांच्या लेकरांना, देशातील युवकांना देणार, देशातील सर्वच पदवीधरांना आम्ही अप्रेंटीशीप देणार आहोत. त्यानुसार 1 वर्षाची नोकरी गॅरंटी स्वरुपात दिली जाणार आहे. खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रात ही नोकरी दिली जाणार असून बँक खात्यात या नोकरीच्या माध्यमातून वर्षासाठी 1 लाख रुपयेही दिले जाणार आहेत. मोदी सरकारने 25 अब्जाधीश बनवले, परंतु आम्ही कोट्यवधी लक्षाधीश घडवणार, अशी घोषणा करत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

शेतकऱ्यांची अनेकदा कर्जमाफी करणार

नरेंद्र मोदींनी 10 वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही, मात्र आम्ही सरकारमध्ये येताच शेतकऱ्यांचं कर्ज माफी करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी आम्ही आयोग बनवणार आहोत. हा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात सरकारला माहिती देईल. त्यामुळे शेतकऱ्यांना एकदा नाही तर अनेकदा कर्जमाफी दिली जाईल. जर अब्जाधीशांचे कर्ज माफ होऊ शकतं, तर शेतकऱ्यांचंही कर्ज माफ झालं पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

जातनिहाय जनगणना करणार

आज देशात 15 टक्के दलित आहेत, 8 टक्के आदिवासी आहेत, 50 टक्के ओबीसी आहेत. त्यामध्ये, 17 टक्के अल्पसंख्याक जोडा, 5 टक्के गरीब जोडा, अशाप्रकारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोक होतात. परंतु देशातील 300 मीडिया चॅनेल्सच्या मालकांची यादी काढली, तर त्यामध्ये 90 टक्क्यांपैकी कोणीही नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यावर भारताचा एक्स रे काढला जाईल म्हणजेच देशातील जातनिहाय जनगणना केली जाईल, अशी घोषणाही राहुल गांधींनी केली.

हेही वाचा – Prakash Ambedkar : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -