घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: हा तर यूटर्ननामा, ठाकरेंनी दुर्दैवी काम ...; उबाठाच्या जाहीरनाम्यावर...

Lok Sabha 2024: हा तर यूटर्ननामा, ठाकरेंनी दुर्दैवी काम …; उबाठाच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंची टीका

Subscribe

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. यात त्यांनी शेतकरी, तरुण ते महिलांसाठीदेखील अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

मुंबई: नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागत आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024 This is U turn nama Chandrashekhar Bawankule s criticism of Uddhav Thackeray Vachannama)

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला. यात त्यांनी शेतकरी, तरुण ते महिलांसाठीदेखील अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी ट्वीट करत या जाहीरनाम्याला युटर्ननामा म्हटलं आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार?

नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे.

ज्यांची ओळख खंडणीखोर आणि 100 कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे, ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांना कविडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले ते म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नाही, असं ट्वीट बावनकुळे यांनी केलं आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय?

ठाकरे गटाच्या वचननाम्यात काय? 

  • राज्यात चाललेली लूट थांबवू, महाराष्ट्राचं वैभव वाढवू.
  • वित्तीय केंद्र नव्याने उभारू, युवकांना नोकरीच्या संधी देऊ.
  • जिल्हा रुग्णालये अद्यायावत करू.
  • ग्रामीण भागात, प्राथमिक उपचार केंद्र आधुनिक करणार.
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु, पीकविमाचे निकष बदलू.
  • बी बीयाणे, खतं यांच्यावरील जीएसटी मुक्त करु.
  • तसंच, शेतकऱ्यांना गोदामं, शितगृह देऊ.
  • कृषीखात्यात सर्व्हे करणारं विभाग स्थापन करून, ज्या पिकाला मागणी आहे, तेच पीक घ्यायला सांगणार त्याला
  • हमीभाव शेतकऱ्यांना देणारच
  • उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू
  • सत्तेचं विकेंद्रीकरण करु
  • कर दहशतवाद थांबवू
  • जीएसटीमधील त्रासदायक अटीशर्थी आर्थिक सल्लागारांशी बोलून थांबवू
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये  महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ.
  • जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थीर ठेवण्याचा प्रयत्न करू.

(हेही वाचा: Lok Sabha : सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर भाजपाची सडकून टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -