घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : ...या कारस्थानात फडणवीसही आनंदाने सहभागी, संजय राऊतांचा आरोप

Lok Sabha 2024 : …या कारस्थानात फडणवीसही आनंदाने सहभागी, संजय राऊतांचा आरोप

Subscribe

मुंबई : भाजपाच्या पहिल्या यादीत पक्षाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यावरून राजकारण रंगले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजपावर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. गडकरी यांना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – Politics: उद्धव ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने…; फडणवीसांचा खोचक टोला

- Advertisement -

गेल्या शनिवारी भाजपाच्या 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही नाव त्यात नसल्यावरून विरोधकांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. काळा पैसा गोळा करणाऱ्या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे मात्र, भाजपा वाढवण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना केले आहे.

- Advertisement -

याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितीन गडकरी हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचं नाव नव्हते. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातील जागांवर जेव्हा चर्चा होईल, त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरी यांचे नाव येईल. त्यामुळे मला वाटते स्वत:ला मोठे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – BJP : सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो; मातोश्रीवर अपमानच होतो; भाजपाचा राऊतांवर हल्लाबोल

त्यावर पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. सत्य असे आहे की, देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहा यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपाच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपाच्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करू शकले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे, हा केवळ बहाणा आहे. गडकरी यांच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरी यांना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : अबकी बार भाजपा तडीपार; उद्धव ठाकरेंचा अमित शहा, फडणवीसांवर पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -