घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : कोल्हापुरात मविआची ताकद वाढली, शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा

Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मविआची ताकद वाढली, शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा

Subscribe

छत्रपती शाहू महाराजांना मविआने उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता एमआयएमकडून देखील महाराजांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे. मविआकडून काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर, महायुतीकडून शिवसेनेतर्फे पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय मंडलिक या उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामुळे मंडलिक यांचे डोकेदुखी आधीपासूनच वाढली आहे. शाहू महाराजांना मविआने उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता एमआयएमकडून देखील महाराजांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी याबाबतची घोषणा केली. (Lok Sabha Election 2024 MIM supports Chhatrapati Shahu Maharaj in Kolhapur Constituency)

पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी आज रविवारी (ता. 21 एप्रिल) याबाबतची घोषणा केली. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जलील यांनी कोल्हापूर लोकसभेबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यामुळे आता खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार हा प्रामुख्याने एमआयएमला पाठिंबा देणारा आहे. ज्यामुळे आता याचा फायदा मविआला होऊ शकतो. एमआयएमव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार उभा केलेला नाही. वंचितने या जागेवर छत्रपती शाहू महाराजंना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.ॉ

- Advertisement -

हेही वाचा… Uddhav Thackeray : मोदी-शहांचा व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगावर ताशेरे

कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मविआतील सर्वच घटक पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यातही शाहू महाराजांची ही पहिलीच निवडणूक असल्याने महाराज खासदारकीच्या पदी विजयी व्हावेत, यासाठी जोर लावण्यात येत आहे. परंतु, विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे या मतदारसंघात प्राबल्य असल्याने त्यांना पराभूत करणे हे मविआसमोरील मोठे आव्हान आहे. पण हे आव्हान आता महायुतीलाच भारी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण दोन पक्षांकडून शाहू महाराजांना थेट पाठिंबा देण्यात आला आहे.

- Advertisement -

छत्रपती शाहू महाराज यांनी किमान यंदा तरी निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांना मविआच्या नेत्यांकडून करण्यात आला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाराजांची भेट घेतली. याशिवाय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडूनही त्यांची भेट घेण्यात आली. ज्यानंतर शाहू महाराजांनी ही निवडणूक हाताच्या पंजावर म्हणजेच काँग्रेसतर्फे लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

हेही वाचा… BJP vs Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंनी काढली आदित्य ठाकरेंची लायकी, काय आहे प्रकरण?

चार दिवसांपूर्वीच महाराजांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे आधी वंचित आणि त्यानंतर आता एमआयएमकडून छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर झाल्याने शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची डोकेदुखी वाढली आहे. तर मविआ आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -