घरक्राइमप्रचार करायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल

प्रचार करायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल

Subscribe

शिंदे गटाचे उपमहानगरप्रमुखास दोन गुंडांची धमकी

लोकसभेचा निवडणूक प्रचार करायचा असेल तर, खंडणी द्यावी लागेल असे म्हणत सराईत गुंडांनी शिंदे गटाच्या उपमहानगरप्रमुखास धमकावल्याचा धक्कादायक प्रकार जेलरोड येथे घडला. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगरप्रमुख शिवाजी लहू ताकाटे (रा. ज्ञानेश्वरनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल मुख्य सूत्रधारास अटक केली आहे.
निलेश पेखळे (रा. मोरेमळा, जेलरोड) आणि विशाल चाफळकर (रा. महाजन हॉस्पिटलमागे, पेंढारकर कॉलनी, जेलरोड) अशी संशयित सराईतांची नावे आहेत. यातील पेखळे हा सूत्रधार असून त्यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार व शिवाजी लहू ताकाटे यांच्या फिर्यादीनुसार, ताकाटे हे शनिवारी (दि.२०) जेलरोड येथील कुबेर कॉर्नरमधील शॉपमध्ये आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासह शिंदे गटाच्या उमेदवाराचा जेलरोड, मोरेमळा भागात प्रचार करण्याच्या दृष्टीने नियोजन करत होते. त्यावेळी संशयित पेखळे व चाफळकर यांनी ताकाटे यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर ताकाटे यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. ताकाटे हे फिर्याद नोंदवित असतानाच पोलिसांनी संशयित खंडणीबहाद्दर पेखळे यास ताब्यात घेत अटक केली. तर, त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस काळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -