घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024: उड्डाण नाहीच; राहुल गांधींचा मुक्काम लातुरात

Lok Sabha Election 2024: उड्डाण नाहीच; राहुल गांधींचा मुक्काम लातुरात

Subscribe

सोलापूरमधील सभा संपवून राहुल गांधी लातूर विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होणार होते. मात्र संध्याकाळी लातूरमधून उड्डाणाची सोय नसल्यामुळे त्यांना आज लातूरलाच मुक्काम करावा लागला.

लातूर: काँग्रेसचे माजी अध्यक्ष, नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी त्यांनी जंगी सभा घेतल्या. सोलापूरची सभा आटपून राहुल गांधी दिल्लीत जाणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे विमान उड्डाण होणार नसल्याने राहुल गांधींनी लातूरमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Lok Sabha Election 2024 No Flight Rahul Gandhi he stayed in Latur)

…म्हणून राहुल गांधीचा लातूरमध्ये मुक्काम

सोलापूरमधील सभा संपवून राहुल गांधी लातूर विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होणार होते. मात्र संध्याकाळी लातूरमधून उड्डाणाची सोय नसल्यामुळे त्यांना आज लातूरलाच मुक्काम करावा लागला. लातूर येथील ग्रँड हॉटेलमध्ये ते दाखल झाले आहेत.

- Advertisement -

राहुल गांझी लातूरमध्ये मुक्काम करणार असल्याचे कळल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी धावपळ झाली. तसंच सुरक्षा यंत्रणेवरही मोठा ताण पडला. कारण, राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेले लातूरमधील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख हे हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

राहुल गांधींच्या मुक्कामाची माहिती मिळताच जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते लातूरकडे धाव घेतानाचे चित्र दिसून येते. तर, लातूरच्या ग्रँड हॉटेलच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी भयभीत झालेत – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर निशाणा साधला. मोदींनी काँग्रेसच्या घोषणापत्रावरुन हे मुस्लीम धार्जिने असल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच तुमची संपत्ती काढून घेतील, असे आरोप केले होते. या आरोपांचा उल्लेख टाळून राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुळ मुद्यांवरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम करत आहेत. जनतेचा रोख त्यांच्या लक्षात आला आहे, निवडणूक हातातून निसटली असल्याचे लक्षात आल्यामुळे ते आता भयभीत झाले आहेत. आणि खोटं बोलायला लागले, असा आरोप राहुल गांधींनी केला.

इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून पंतप्रधानांनी मोठी चोरी केली आहे. निवडणुकीनंतर त्यांना ते निस्तारता येणार नाही, त्यांची फजिती होणार आहे, म्हणून ते घाबरले आहेत, असा टोला राहुल गांधींनी लगावला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्षात आले आहे की देशातील जनतेला इलेक्ट्रोल बॉण्डचे गौडबंगाल लक्षात आले आहे. देशातील जनता आता संविधान रक्षणासाठी पुढे सरसावली आहे. नरेंद्र मोदी गरीबांचे नाही तर अब्जाधिशांचे नेते आहेत, हे जनतेच्या लक्षात आले असल्याचे त्यांना कळाले आहे. त्यांचे बिंग फुटल्यामुळे ते भयभीत झाले आहेत आणि घाबरल्यानंतर भयभीत झाल्यानंतर ते खोटं बोलायला सुरवात करतात.

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला; आता छुप्प्या प्रचारावर उमेदवारांचा भर)


Edited By- Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -