घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिंडोरीत सूरत-चेन्नई प्रकल्प रखडला

दिंडोरीत सूरत-चेन्नई प्रकल्प रखडला

Subscribe

जमिनींचे मूल्यांकन नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित

सूरत-चेन्नई एक्सप्रेस हायवे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड या चार तालुक्यातून जाणार आहे. या एक्सप्रेस हायवेमुळे सूरत-नाशिकदरम्यान 1270 किलोमीटर अंतर कमी होणार असून, हे अंतर अवघे १७६ किलोमीटरवर येईल. नव्या महामार्गामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सूरत शहर गाठता येईल. मात्र, नाशिक जिल्ह्यातून जाणार्‍या सूरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनास नाशिकसह दिंडोरीतील शेतकर्‍यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

 

- Advertisement -

काही शेतकर्‍यांना शासनाचा दर अमान्य आहे. बोटावर मोजण्याइतक्या शेतकर्‍यांनीच हा मोबदला स्वीकारला आहे. बाकी शेतकर्‍यांना मोबदला वाढवून हवा आहे. एकाच सातबारा उतार्‍यावर अनेकांची नावे असल्याने एकमत होत नसल्याने ग्रीनफिल्डचे भूसंपादन कासवगतीने होत आहे. नाशिक जिल्ह्यातील जमिनींचे मूल्यांकन झालेले नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू सुद्धा झाली नाही. जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आणि भूसंपादनाच्या अपुर्‍या मोबदल्याबाबत त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली.

 

- Advertisement -

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दोन दिवसांत भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. सखोल सर्व्हेक्षण करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -