घरठाणेJitendra Awhad : निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का? आव्हाडांची पोस्ट...

Jitendra Awhad : निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का? आव्हाडांची पोस्ट व्हायरल

Subscribe

भाजपाच्या उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग करण्यात येत असल्याची तक्रार मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.

ठाणे : देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. पण याच नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार गेल्या काही दिवसांपासून मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपुरचे भाजपा उमेदवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आचारसंहितेचा भंग झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Jitendra Awhad shared post that BJP has violated Code of Conduct)

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X या सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. आव्हाडांनी एका सोशल मीडिया युजरची पोस्ट रिपोस्ट केली आहे. निशांत बनगेरा नामक व्यक्तीने ठाण्यातील काँग्रेस आणि भाजपा कार्यालयाचे फोटो त्याच्या अकाउंटला पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये काँग्रेसकडून आचारसंहितेचे नियम पाळण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे मात्र, भाजपा आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : धैर्यशील मानेंची डोकेदुखी वाढणार, हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत

या फोटोमध्ये काँग्रेसने आपल्या कार्यालयावरील नाव, चिन्ह आणि नेत्यांचे फोटो झाकले असून भाजपाने मात्र, कार्यालयावरील पक्षाचे नाव, चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो तसेच ठेवले आहेत. ही पोस्ट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अकाउंटवर शेअर करत “आमच्या ठाण्यात उघडपणे आचारसंहितेचा भंग होत असताना (की ठरवून केलेले दुर्लक्ष) निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही पोस्ट त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि ठाणे कलेक्टर ऑफिसला टॅग केली आहे.

- Advertisement -

काय आहे जितेंद्र आव्हाडांची पोस्ट?

“निवडणूक आयोगाने किती छातीठोकपणे सांगितलं तरी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपला एक न्याय आणि इतर पक्षांना दुसरा, हे आचारसंहिता लागू झाल्यापासून अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालंय. आमच्या ठाण्यात उघडपणे आचारसंहितेचा भंग होत असताना (की ठरवून केलेले दुर्लक्ष) निवडणूक आयोगाकडून कारवाईची अपेक्षा करता येईल का? की सत्ताधारी पक्षाला पक्ष कार्यालयावरील नाव, चिन्ह आणि नेत्यांचे फोटो झाकण्यातून सूट देण्यात आली आहे? @ECISVEEP @SpokespersonECI @ThaneCollector” असे स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा… Sangli Lok Sabha : वरिष्ठांच्या निर्णयानंतरही काँग्रेस सांगलीचा तिढा कायम; विशाल पाटलांसाठी ही कमिटी बरखास्त?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -