घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : क्लायमॅक्स इंटरेस्टिंग होईल..., सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर शिंदे गट

Lok Sabha 2024 : क्लायमॅक्स इंटरेस्टिंग होईल…, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर शिंदे गट

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या जागा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ताब्यात घेतल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या जागा मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेत असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधत, क्लायमॅक्स इंटरेस्टिंग होईल, असा टोला लगावला आहे.

शिवसेनेने ज्या जागा लढविल्या आहेत, त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे, असे शिंदे गटाकडून वारंवार सांगितले जात आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 25 तर शिवसेनेने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाने 23 तर, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. म्हणजेच, शिंदे गटाला 23 जागा पाहिजे होत्या. पण आजघडीला शिंदे गटाकडे 13 खासदार असूनही त्या जागाही हातातून जाण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024: कल्याणची जागा डॉ. श्रीकांत शिंदे हेच लढवणार; फडणवीसांनी केलं स्पष्ट

शिंदे गटाकडून आतापर्यंत 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण त्यात दोन विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. त्यात यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे कृपाल तुमाने यांचा समावेश आहे. तिथे अनुक्रमे राजश्री पाटील आणि राजू पारवे यांना शिवसेनेने उमेदावरी दिली आहे. तर, हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी आधी जाहीर करण्यात आली होती. पण स्थानिक स्तरावर भाजपाकडून विरोध झाल्याने एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांचे तिकीट कापून बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली.

- Advertisement -

तर, परभणीमध्ये सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव असल्याने शिंदे गटाचा त्यावरही दावा होता. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असून तेथून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तशाच प्रकारे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली असून तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. येथे सध्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, हे उल्लेखनीय.

हेही वाचा – Thackeray group : मोदी आणि नेतान्याहू या एकाच नाण्याच्या दोन बाजू, ठाकरे गटाची घणाघाती टीका

याशिवाय, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, ठाणे, पालघर आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा तिढा आहेच. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, ठाणे आणि पालघर हे शिवसेनेचे बालकिल्ले म्हणून ओळखले जातात. पण भाजपाच्या आग्रही भूमिकेमुळे शिवसेनेला ते मिळणे कठीण झाले आहे. तर, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारीवरून शिंदे गटातील विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम या ज्येष्ठ नेत्यांमध्ये तू तू मैं मैं रंगले होते. ही वाद अगदी वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचला होता. पण आता ही जागा शिंदे गटाला मिळते की नाही, याबद्दलच साशंकता आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. नाशिक, हिंगोली, वाशिम – यवतमाळ, सिंधुदुर्ग – रत्नागिरी नंतर आता धाराशिवमध्ये बॅक फुटवर जायला लागले. आपण नुसते बघत बसायचे, असे सांगत, क्लायमॅक्स इंटरेस्टिंग होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाने मनावरचा दगड बाजूला काढताच, शिंदे गटाचा ‘फेव्हिकॉल’चा जोड डळमळीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -