घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून प्रथमच स्थानिक उमेदवार, उपरा उमेदवार...

Lok Sabha 2024 : कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून प्रथमच स्थानिक उमेदवार, उपरा उमेदवार नको असल्याची मागणी पूर्ण

Subscribe

Lok Sabha Election2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असून देखील अद्यापपर्यंत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. ठाकरे गटाने मात्र वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.

डोंबिवली : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या वाटाघाटी अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या उमेदवारांची अधिकृत उमेदवारी निश्चित झालेली नाही. टप्प्याटप्प्यात उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असून देखील अद्यापपर्यंत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. ठाकरे गटाने मात्र वैशाली दरेकर – राणे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. (Lok Sabha Election 2024 Vaishali Darekar Thackeray group local candidate in Kalyan Lok Sabha )

हेही वाचा… Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कल्याणमधून वैशाली दरेकर मैदानात

- Advertisement -

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी अद्यापपर्यंत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना तगडे आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाने गेले काही महिने चाचपणी केली. यामध्ये शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई व ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र ही नावे आता मागे पडली असून वैशाली दरेकर यांचे नाव समोर आले आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यापासून येथील खासदार ठाण्याचा म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघा बाहेरील दिला गेला आहे. कल्याणचा खासदार हा स्थानिकच असावा, बाहेरून आयात केलेला वा उपरा उमेदवार नको, इथल्या स्थानिक कार्यकर्त्याला संधी द्या आणि नेतृत्व घडवा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. यापूर्वी शिवसेनेने या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे ठाण्याचे आनंद परांजपे आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार झाले.

- Advertisement -

ऐतिहासिक, सांस्कृतिक, सुशिक्षितांच्या नगरीत कल्याण लोकसभा मतदार संघासाठी स्थानिक तुल्यबळ असा उमेदवार मिळतच नाही का? हा सवाल केला जात होता. कल्याण लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारांची वानवा नाही, मात्र इथे नेतृत्व निर्माण करायचेच नाही, स्थानिक नेतृत्व कधी ठाण्याच्या पुढे जावू नये, अशी जिल्ह्याच्या नेत्यांची भूमिका कायम राहिल्याचे दिसून आले आहे, ठाण्यापलीकडील भाग आजपर्यंत जसा विकासापासून वंचित वा मागे राहिला, तशाच प्रकारे ठाण्यापलीकडील नेतृत्व जाणीवपूर्वक पुढे आणले जात नाही, असेच चित्र कायम राहिले आहे. मात्र दीड दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे गटाने याची गंभीर दखल घेत पावले टाकण्यास सुरुवात केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भूमिपुत्रांची असलेली मते आणि स्थानिकांची मागणी लक्षात घेता माजी आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र भोईर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने भूमिपुत्र उमेदवार देण्याची मागणी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शिवसेनेने सुशिक्षित व अभ्यासू अशा माजी नगरसेविका व माजी विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर यांच्या उमेदवारी ठाकरे गटाने शिक्कामोर्तब करीत स्थानिक उमेदवार देण्याची मागणी एका अर्थाने पूर्ण करण्यात आली आहे.

कोण आहेत वैशाली दरेकर?

वैशाली दरेकर राणे या कल्याण डोंबिवली महापालिकेत 10 वर्षे नगरसेविका होत्या. सुरुवातीची काही वर्षे त्या शिवसेनेत होत्या. 2009मध्ये वैशाली दरेकर यांनी मनसेच्या तिकिटावर कल्याण लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेचे आनंद परांजपे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत डावखरे यांचे तगडे आव्हान होते. त्या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी तब्बल 01 लाख 02 हजार 63 मते घेतली होती. हा मतदारसंघ आपल्यासाठी नवीन नाही. मतदार संघातील समस्या माहिती आहेत. ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आधीच निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे यावेळी श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रीक रोखत आपणच संसदेत पोहोचणार, असा दावा दरेकर यांनी केला आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : 80 कोटींची मालमत्ता तर, 39 कोटींची उसनवारी; विदर्भातील उमेदवाराचे शपथपत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -